Blocked Arteries Symptoms: “तुमच्या रक्तवाहिन्या ७०% पर्यंत ब्लॉक झालेल्या असू शकतात, तरीही तुम्हाला कदाचित काही त्रास जाणवत नसेल; पण एक दिवस अचानक शरीर इशारा देऊ लागते. रक्तवाहिन्या मदतीसाठी ओरडत नाहीत, त्या हळूच संकेत देतात. मात्र, बहुतेक लोक हे संकेत थकवा, ताण किंवा ‘वय वाढल्यामुळे होतंय’, असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात हे तुमच्या शरीराचे इशारे असतात.
१८ वर्षांचा अनुभव असलेले रक्तवाहिन्यांसंबंधित तज्ज्ञ डॉ. सुमित कपाडिया सांगतात की, अनेक रुग्ण कोणतीही मोठी वेदना किंवा गंभीर लक्षणं नसताना तपासणीस येतात; पण तपासणीत त्यांच्या रक्तवाहिन्या अरुंद झालेल्या असल्याचं आढळतं.”
लवकर तपासणी का महत्त्वाची?
डॉ. कपाडिया सांगतात की, लवकर तपासणी करणं खूप गरजेचं आहे, विशेषतः जर तुम्हाला खालीलपैकी काही समस्या असतील तर…
- मधुमेह (डायबिटीस)
- उच्च रक्तदाब
- सतत थकवा जाणवणे
- धूम्रपान करण्याची सवय असणे
- कुटुंबात रक्तवाहिन्या किंवा हृदयाच्या आजारांचा इतिहास असणं
अशा लोकांनी वेळेत तपासणी करून घेणं फार महत्त्वाचं आहे. नियमित तपासणी महत्त्वाची आहे. हृदयाच्या आजारांच्या बाबतीत नियमित तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे.
अचानक आणि कारण नसलेला थकवा
हा तो थकवा नाही, जो कमी झोप किंवा दिवसभराच्या कामामुळे येतो. हा वेगळाच थकवा असतो, जो फारसं काही काम न करतादेखील जाणवतो. कधी कधी साधी कामं – जसं की अंथरूण आवरणं किंवा खोलीत थोडं चालणं – केल्यानंतरही खूप दमल्यासारखं वाटतं.
विशेषतः महिलांना इतर लक्षणं दिसण्याआधी असा थकवा जाणवतो; पण अनेकदा तो ताणतणाव किंवा हार्मोन्समुळे आहे, असं समजून दुर्लक्ष केलं जातं.
जेव्हा रक्तवाहिन्या अवरुद्ध होतात, तेव्हा हृदय आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे कोणतंही ठोस कारण नसताना शरीराची ‘बॅटरी’ संपल्यासारखी वाटते.
छातीत दाब किंवा अस्वस्थता
ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे नेहमीच तीव्र वेदना होतात, असं नाही. कधी कधी छातीत विचित्र दाब किंवा जडपणा जाणवतो – जसं काही छातीवर जड ओझं ठेवल्यासारखं किंवा पट्टा खूप घट्ट बांधल्यासारखं वाटतं.
वेगाने चालताना किंवा जिने चढताना हा त्रास जाणवू शकतो आणि थोडी विश्रांती घेतल्यावर कमीही होतो. अनेक लोक याला वेदना न म्हणता, फक्त अस्वस्थता, असं सांगतात.
हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही तेव्हा असं होतं. हा त्रास ‘ॲसिडिटी’ किंवा ‘गॅस’ समजून दुर्लक्ष करू नका. विशेषतः तुम्ही जोखमीच्या गटात असाल, तर लगेच तपासणी करून घ्या.
श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे
थोडेसे जिने चढले किंवा वेगाने चालले तरी अचानक धाप लागते, चक्कर येते किंवा डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं. कधी कधी ???झोपताना सरळ पडल्यानंतरही (की- पाठीवर सरळ अवस्थेत झोपल्यानंतरही)??? श्वास घेणं कठीण जातं आणि धाप लागल्यासारखं होतं.
थोडा थांबून सावरावं लागतं, अशी भावना रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागल्यावर दिसते. काही लोकांना उभं राहताना, व्यायामानंतर किंवा अगदी शांत बसलेले असतानाही चक्कर येऊ शकते.
ही लक्षणं अनेकदा रक्तक्षय, पाणी कमी पिणं किंवा वाढतं वय यांमुळे आहेत, असं समजून दुर्लक्षित केली जातात. पण, ही लक्षणं वारंवार दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण- आतून रक्तवाहिन्यांमधील अवरुद्धता हळूहळू वाढत जाऊ शकते.
थंड हात-पाय, बधिरपणा आणि जखम उशिरा बरी होणे
रक्ताभिसरण नीट होत नसेल, तर त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. हात-पाय खूप थंड होणे, मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे किंवा जखम लवकर न भरणे ही सुरुवातीची सामान्य लक्षणे आहेत.
कधी कधी एक पाय, एक हात किंवा अगदी एक बोट दुसऱ्यापेक्षा वेगळं वाटतं – जास्त थंड, फिकट रंगाचं, कमजोर किंवा वेगळंच वाटणं. ही लक्षणं अनेकदा साधी समजून दुर्लक्ष केली जातात.
पण याचा अर्थ असा असू शकतो की, त्या भागात पुरेसं रक्त पोहोचत नाही. त्वचेचा रंग बदलणं, तापमान बदलणं किंवा जखम उशिरा बरी होणं हे कायम दिसत असेल, तर ते दुर्लक्ष करू नका.
विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची धोक्याची चिन्हं आहेत.
शरीरात जास्त वेदना होणं
हृदयाशी संबंधित वेदना नेहमीच फक्त छातीत होतात, असं नाही. त्या जबड्यात, डाव्या हातात, वरच्या पाठीमध्ये किंवा खांद्यांच्या मधल्या भागातही जाणवू शकतात.
कधी कधी कोणतंही कारण नसताना दात दुखणं, मान दुखणं किंवा काम करताना हातात वेदना होणं, असे त्रास दिसू शकतात. शरीरातील नसा एकमेकांशी जोडलेल्या असल्यामुळे मेंदूला वेदना नेमक्या कुठून येत आहेत हे चुकीचं वाटू शकतं. त्यामुळे हृदयाचा त्रास वेगळ्याच आजारासारखा भासू शकतो.
जर व्यायाम करताना, ताणतणावात किंवा धाप लागल्यासोबत शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना जाणवत असतील, तर त्याकडे गांभीर्यानं पाहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. हृदयाशी संबंधित कारणं आहेत का हे तपासून घेणं महत्त्वाचं आहे.
ही ‘सायलेंट’ लक्षणं का महत्त्वाची?
अनेक वेळा रक्तवाहिन्या खूप जास्त अरुंद झालेल्या असतात, जवळपास ८० ते ९० टक्के – तरीही लोकांना छातीत वेदना होत नाहीत. त्यामुळेच नियमित तपासणी करणं खूप गरजेचं ठरतं. विशेषतः ज्यांना दीर्घकाळाचे आजार आहेत, कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, त्यांनी तपासणी नक्की करून घ्यावी.
डॉ. कपाडिया सांगतात की, साध्या तपासण्या जसे की, अँकल ब्रॅकियल प्रेशर इंडेक्स किंवा डॉप्लर स्कॅन यांमुळे हा त्रास लवकर समजू शकतो. त्यामुळे गंभीर लक्षणं दिसण्याआधीच समस्या ओळखता येते आणि मोठा धोका टाळता येतो.
वेळीच तपासणी केल्यास जीव वाचू शकतो आणि योग्य वेळी उपचार घेता येतात. त्यामुळे हृदय आणि संपूर्ण आरोग्य सुरक्षित राहते. या तपासण्या नियमित सवयीत घेतल्यास अचानक येणाऱ्या हृदयविकाराचा धोका खूप कमी होऊ शकतो.
हृदयाचं नुकसान कसं टाळायचं?
संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेऊन, तसेच नियमित व्यायाम करून हृदयाचं नुकसान टाळता येऊ शकतं.
व्यायामाचं महत्त्व
नियमित व्यायाम केल्यानं रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणारे अडथळे टाळण्यास आणि नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत होते. त्यामुळे रक्तप्रवाहातील अडथळ्यात सुधारणा होत, सूज कमी होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होण्यास मदत मिळते.
चालणे, सायकल चालवणे किंवा हलका व्यायाम केल्यानं हृदय अधिक चांगल्या प्रकारे काम करतं. त्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि त्यामध्ये चरबी साचण्याचा धोका कमी होतो.
अवरुद्ध झालेल्या रक्तवाहिन्यांची लक्षणं
छातीत वेदना किंवा दाब जाणवणे (अँजायना), धाप लागणं, थोडंसं काम केल्यावरही खूप थकवा येणं, तसेच चक्कर येणं किंवा डोकं हलकं वाटणं – ही लक्षणं अनेकदा एकत्र दिसतात. ही हृदय किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित गंभीर समस्यांचे इशारे असू शकतात.
याचा अर्थ असा असू शकतो की, हृदयाला पुरेसं ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही. त्यामुळे ही लक्षणं अचानक दिसली किंवा हळूहळू वाढत गेली, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे.
