Natural Cholesterol Remedy: अस्वस्थ आहार, जंक फूडचे वाढते सेवन आणि बिघडलेली जीवनशैली… या सर्वांमुळे अनेक घातक आरोग्यसमस्या झपाट्याने वाढत आहेत. त्यात सर्वात जास्त भीतीदायक ठरत असलेली समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉलची वाढ. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर रोगांना निमंत्रण देते.

खरंतर, कोलेस्ट्रॉल हे शरीरात आढळणारे मेणासारखे लिपिड आहे. ते व्हिटॅमिन डी, स्टेरॉइड हार्मोन्स आणि पित्त रस तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरभर कोलेस्ट्रॉल लायपोप्रोटीनच्या स्वरूपात फिरत असते आणि चरबी पचवण्यास मदत करते. परंतु, जेव्हा हेच कोलेस्ट्रॉल नसांमध्ये साठू लागते, तेव्हा ते जीवघेणे ठरते.

अहवालांनुसार, भारतातील सुमारे २५-३०% लोकसंख्या उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक झाले आहे आणि आश्चर्य म्हणजे हे उपाय तुमच्या घरातच आहेत! स्वयंपाकघरात असलेले चार साधे मसाले तुमच्या नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद ठेवतात. अनेक वैज्ञानिक संशोधनांनीही याची पुष्टी केली आहे.

‘हे’ ४ औषधी मसाले म्हणजे

  • दालचिनी
  • लसूण
  • आलं
  • हळद

यात आढळणारे नैसर्गिक घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि नसांमधील घातक चिकट थर विरघळवण्यास मदत करतात.

दालचिनी:

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, दालचिनीचा नियमित वापर केल्यास एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉलमध्ये ७–१०% घसरण दिसून येते. दालचिनीतील अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म वाईट कोलेस्ट्रॉलसह ट्रायग्लिसराइड्सही कमी करतात. सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी आणि मध मिसळून घेतले तरीही फायदा दिसून येतो.

लसूण:

लसूण अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, लसूणमधील अ‍ॅलिसिन नावाचा घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी विशेष प्रभावी आहे. तो रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो आणि ब्लड प्रेशरही नियंत्रित करतो.
दररोज सकाळी १–२ कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात.

हळद:

एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, हळदीतील करक्यूमिन हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून तो रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक निर्माण होण्यापासून प्रतिबंध करतो. हळद दुधात किंवा अन्नात नियमित घेतल्यास ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी होऊ शकते.

आलं:

आल्यामध्ये तीव्र दाहशामक (anti-inflammatory) गुण आहेत. करंट फार्मास्युटिकल डिझाइन जर्नलनुसार, आल्याचे दैनंदिन सेवन उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. आलं चहा, काढा किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले तरी फायदा होतो.

शेवटी महत्त्वाची सूचना…

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि सवयी बदलणे अत्यावश्यक आहे. परंतु, या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी काही अन्नपदार्थ विषासारखे घातक ठरतात, म्हणून त्यांचा विशेषतः त्याग करणे गरजेचे आहे.