Ayurvedic Kadha for Cold & Cough: सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असेल तसंच अगदी थंडीत शरीराला उबदार वाटावे म्हणून काढा आवर्जून प्यायला जातो. हे एक आयुर्वेदिक पेय आपण म्हणू शकतो. काढा हे पेय औषध वनस्पती आणि काही भारतीय मसाले वापरून तयार केला जातो. अनेक आजारांवर तो उपयोगी ठरतो. तसंच शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यातही काढा अत्यंत उपयोगी ठरतो. पारंपरिक काढ्यामध्ये तुळस, आले, मिरपूड यासारख्या गोष्टी वापरल्या जातात. मात्र प्रत्येक समस्येसाठी आपण एकाच प्रकारच्या घटकाचा वापर करून काढा बनवतो. तेव्हा काढ्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ टाकल्यास तो वेगवेगळ्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो.
घसा खवखवणे
बदलत्या हवामानात घसा खवखवणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी लिकोरीस आणि बडीशेप उपयुक्त ठरू शकतात. एका जातीची बडीशेप आणि ज्येष्ठ मध घसा खवखवत असल्यास आराम देऊ शकतो. ज्येष्ठ मध हे घसा शांत करण्यासाठी वापरले जाते. तसंच बडीशेप पचनास मदत करण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा घसा खवखवतो तेव्हा या दोन गोष्टी घालून काढा तयार करा. यासाठी गरम पाण्यात अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर एक चमचा बडीशेप किंवा बडीशेपची पावडर यासोबत मिसळा. ५ ते ७ मिनिटे झाकून ठेवा आणि नंतर एक एक घोट पिऊन घ्या.
घट्ट कफ होणे
घट्ट कफ झाला असेल तर श्वसनमार्गाची सूज किंवा जळजळ आणि जास्त प्रमाणात श्लेष्मा तयार होणे अशा समस्या उद्भवतात. यावर उपाय म्हणून पिंपळी, आले आणि मध फायदेशीर ठरू शकते. पिंपळी आणि आले घसा शांत आणि उबदार करू शकतात. कफ किंवा छातीत घट्टपणावर उपाय म्हणून हे फायदेशीर ठरू शकते. श्वसनाच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी याचा वापर फायद्याचा ठरतो. मध खोकला दूर करू शकतो. यासाठी चिमूटभर पिंपळी आणि वाळलेल्या आल्यामध्ये किंवा सुंठ पावडरमध्ये मध घालून खा.
नाक चोंदणे आणि घट्ट कफ छातीत जमा होणे
यावर उपाय म्हणून ओवा आणि मिरपूड याचे पाणी प्या. ओव्यामध्ये थायमोल सारखे सुवासिक घटक असतात आणि काळी मिरीमध्ये पायपरिन असते. सर्दी-खोकल्यासाठी किंवा छातीत कफ जमा असल्यास या दोन्ही एकत्रित वापर शरीराला उबदारपणा देऊ शकतो. यासाठी एक कप पाण्यात अर्धा चमचा ओवा आणि २ ते ३ काळी मिरी कुटून स्लो गॅसवर उकळवा. गरम असतानाच ते पिऊन घ्या.
