Blood Pressure, Heart Attack Prevent Fruit: डाळिंब हे एक असं फळ आहे जे फक्त आपल्या सुंदर दिसण्यामुळेच नाही तर चवीमुळेही लोकांना खूप आवडतं. डाळिंब जवळपास वर्षभर मिळणारं फळ आहे. लोक ते सोलून थेट खातात, तर काहीजण त्याचा ज्यूस करून पिणं पसंत करतात. आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत डाळिंबाला सुपरफूड मानलं जातं.
रजिस्टर्ड डाएटिशियन जोनाथन पर्टेल (Jonathan Purtell) यांनी सांगितलं की, डाळिंबाचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ ही तुमच्या शरीराच्या गरजा आणि आरोग्यावर अवलंबून असते. अलीकडच्या संशोधनानुसार, डाळिंबामध्ये असलेले शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. हे घटक रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात आणि हृदय व मेंदूचं काम चांगलं करण्यास मदत करतात.
द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, डाळिंब फक्त चव आणि रंगासाठीच नाही तर औषधी गुणांसाठीही ओळखलं जातं. संशोधनात असं आढळलं आहे की, डाळिंबाचं नियमित सेवन केल्याने हृदय, मेंदू आणि त्वचेला फायदा होतो. काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासही ते मदत करू शकतं.
डाळिंब हे जगातील सर्वात जुन्या फळांपैकी एक मानलं जातं. त्याची सुरुवात इराण भागात झाली असं मानलं जातं आणि हजारो वर्षांपासून त्याचा वापर अन्न आणि पारंपरिक औषध म्हणून केला जात आहे. डाळिंबामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. रोज त्याचं सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. चला जाणून घेऊया की डाळिंबाचा ज्यूस बीपी आणि हृदयासाठी कसा फायदेशीर आहे आणि तो पिण्याची योग्य वेळ कोणती आहे.
तज्ज्ञांनी सांगितलं की, पचन चांगलं राहण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला पिणं उत्तम मानलं जातं.
हार्ट हेल्थसाठी डाळिंबाचा ज्यूस कसा मदत करतो?
डाळिंबाचा ज्यूस पिण्याचा खरा फायदा तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही तो नियमितपणे आहारात समाविष्ट करता. एलेन यांनी सांगितलं की, फायदे पाहायचे असतील तर तो सतत प्यायला हवा. ज्या अभ्यासांमध्ये रक्तदाबावर फायदा दिसला, त्यात रोज सेवन करण्यावर भर देण्यात आला होता, कोणत्या वेळी प्यायचा यावर नाही.
अँटीऑक्सिडंट्सने भरलेल्या डाळिंबाच्या ज्यूसमध्ये पॉलीफेनॉल्स असतात, जे रक्तवाहिन्या निरोगी आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात. डाळिंब शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार होण्यास आणि त्याचा वापर होण्यास मदत करतं. हा असा घटक आहे जो रक्तवाहिन्यांना आराम देतो. रोज डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने रक्तवाहिन्या शांत, लवचिक आणि स्मूथ राहतात, त्यामुळे बीपी नियंत्रणात राहतो. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की, रोज डाळिंबाचा ज्यूस घेतल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
डाळिंबाचा ज्यूस कधी प्यावा?
यूएसएफ कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थमधील पोषण कार्यक्रमांच्या संचालक आणि असोसिएट प्रोफेसर लॉरी राइट (Lauri Wright) यांच्या मते, हार्ट हेल्थसाठी डाळिंबाचा ज्यूस पिण्याची एक ठरलेली वेळ नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो नियमितपणे पिणं. तज्ज्ञांनी सांगितलं की, डाळिंबातील पॉलीफेनॉल्स हळूहळू रक्तवाहिन्यांचं काम सुधारतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात.
डाळिंबाचा ज्यूस कधी पिणं योग्य आहे?
ज्यांना पोट संवेदनशील असतं किंवा ॲसिडिटीची समस्या असते, त्यांच्यासाठी सकाळी किंवा दुपारी डाळिंबाचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. सकाळी डाळिंबाचा ज्यूस घेतल्यास शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
डाळिंबाचा ज्यूस कधी पिऊ नये?
नॅटली ॲलन (Natalie Allen) यांच्या मते, जर तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स किंवा हार्टबर्नची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी डाळिंबासारखे आंबट ज्यूस पिल्याने त्रास वाढू शकतो. जर तुम्हाला डायबिटीज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा ज्यूस पिल्याने ब्लड शुगर झपाट्याने वाढू शकते. अशावेळी तो खाण्यासोबत किंवा प्रोटीनयुक्त स्नॅकसोबत घेणं चांगलं ठरतं. याशिवाय, डाळिंबाचा ज्यूस काही ब्लड प्रेशर, स्टॅटिन किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत प्रतिक्रिया देऊ शकतो. त्यामुळे अशी औषधं घेणाऱ्या लोकांनी तो रोजच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एकूणच, तो पिण्याची चुकीची अशी ठरलेली वेळ नाही. फक्त अशी वेळ निवडा जी तुमच्या पचनासाठी आणि ब्लड शुगर नियंत्रणासाठी योग्य असेल.
रोज किती डाळिंबाचा ज्यूस प्यावा?
बहुतेक क्लिनिकल अभ्यासांमध्ये रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांच्या फायद्यासाठी रोज ४–८ औंस म्हणजे साधारण अर्धा ते एक कप १००% साखर नसलेला डाळिंबाचा ज्यूस वापरण्यात आला. एवढ्या प्रमाणात ज्यूस प्यायल्याने पुरेसे पॉलीफेनॉल्स मिळतात आणि जास्त साखर व कॅलरीही घेतल्या जात नाहीत. त्यामुळे पूर्ण बाटली पिण्याची गरज नाही, रोज एक छोटा ग्लास पुरेसा आहे. तज्ज्ञांनी सांगितलं की, डाळिंबाचा ज्यूस हेल्दी लाइफस्टाइलसोबत घेतल्यास त्याचा सर्वाधिक फायदा दिसतो. एलेन यांनी असंही सांगितलं की, डाळिंबाचे दाणेही त्याच्या ज्यूसइतकेच फायदेशीर ठरतात.
