Body Detox Drinks: आजच्या काळात त्वचा, केस आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक महागडी रसायनयुक्त उत्पादने उपलब्ध आहेत. आकर्षक जाहिरातींमुळे अनेक लोक अशा उत्पादनांकडे आकर्षित होतात. मात्र, काही उत्पादने तात्पुरते परिणाम दाखवत असली तरी त्यातील रसायनांमुळे काही लोकांना दुष्परिणामही जाणवू शकतात. दुसरीकडे आयुर्वेद ही हजारो वर्षांची पारंपरिक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदामध्ये नैसर्गिक वनस्पती, औषधी घटक आणि संतुलित जीवनशैलीला महत्त्व दिले जाते. या नैसर्गिक घटकांचा वापर आरोग्य आणि सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे अनेक लोक आजही आयुर्वेदिक उपायांवर विश्वास ठेवतात.

तथापि, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. अशा परिस्थितीत तुम्हाला शरीरातील टाकाऊ घटक बाहेर काढायचे आहेत ना? मग आजपासून ‘या’ पेयांचे सेवन सुरू करा..

आयुर्वेदिक किंवा रसायनयुक्त उत्पादन वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समतोल साधून योग्य उत्पादनांची निवड केल्यास आरोग्य आणि सौंदर्य दीर्घकाळपर्यंत जपणे अधिक सोपे होऊ शकते.

दरम्यान, यकृतामध्ये साचलेली अशुद्धता दूर करण्यासाठी लोक अनेकदा बाजारातून डिटॉक्स ड्रिंक्स विकत घेतात. परंतु, बाहेरून महागडी डिटॉक्स ड्रिंक्स विकत घेण्याऐवजी तुम्ही घरगुती घटकांचे सेवन करू शकता. हे घटक कोणत्याही महागड्या डिटॉक्स वॉटरपेक्षा अधिक प्रभावीपणे काम करतात आणि शरीर स्वच्छ करतात. ही घरगुती घटकांचा वापर करून तयार केलेली घरगुती पेये व्यावसायिक डिटॉक्स वॉटरपेक्षा अनेक पटींनी अधिक प्रभावी आहेत.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी करा या पेयांचे सेवन

दुधीचा रस

दुधी भोपळ्यामध्ये नैसर्गिक यकृतसंरक्षक घटक असतात आणि ते तुमच्या यकृताच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर, एका वाटीत चिरलेल्या ताज्या दुधी भोपळ्याचे तुकडे मिक्सरमध्ये एका ग्लास पाण्यासोबत घालून बारीक करा आणि ते द्रावण गाळून घ्या. हे द्रावण थोडे काळे मीठ घालून रोज प्या. असे केल्याने तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला सुरुवात होईल.

जिऱ्याचे पाणी

जिरे यकृतातील एंझाइम्सना उत्तेजित करते, ज्यामुळे पचनक्रिया आणि विषहरण दोन्ही सुधारते. जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक चमचा जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी तयार झालेले ते औषधी पाणी उकळून गाळून घेऊन प्या.

लिंबू पाणी

लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे यकृतातील पित्तनिर्मितीस मदत करते, जे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. त्याचे सेवन करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि रिकाम्या पोटी तेन प्या. याचे डिटॉक्सिफाईंग परिणाम आश्चर्यकारक आहेत.