Body Weight Chart By Hight : वजन हा आपल्या आयुष्यातील एक असा घटक आहे ज्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक तणावही वाढतो. त्यामुळे अनेक जण फिटनेसकडे वळतात. फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाणे किंवा कमी खाणे नाही. तर तुमच्या शरीराला फिट ठेवणे आहे. लोक अनेकदा वजन कमी करण्यासाठी संघर्ष करतात. पण, त्यांना त्यांच्या उंची, वयानुसार त्यांचे आदर्श शरीराचे वजन किती असावे हेच माहिती नसते. तुम्हाला माहित आहे का की, कमी वजन केवळ तुमच्या दिसण्यावर परिणाम करत नाही तर मधुमेह आणि थायरॉईड रोगासारख्या आजारांना देखील कारणीभूत ठरते.
‘द लांसेट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या मोठ्या संशोधनानुसार, ज्या लोकांचा BMI (वजन-उंची प्रमाण) १८.५ ते २४.९ या मर्यादेत असतो. त्यांना हृदयविकार आणि टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका सर्वात कमी असतो. म्हणजेच, उंचीच्या मानाने योग्य वजन ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, वयानुसार स्नायूंची घनता कमी होते आणि चरबी वाढते. संशोधनानुसार, ४० ते ६० वयोगटातील थोडे जास्त शरीराचे वजन (BMI २३-२६) कधीकधी हाडांच्या आरोग्यासाठी (BMI) संरक्षणात्मक असू शकते. पण, ते लठ्ठपणाचे लक्षण मानले जाऊ नये. आजच्या खास लेखात, आम्ही तुम्हाला एक सोपा वजन चार्ट दाखवणार आहोत; जो तुम्हाला तुमचे वजन जास्त आहे की कमी, लठ्ठपणा तर नाही ना याबद्दल माहिती मिळेल.
बीएमआयनुसार वजन
| बीएमआय | वजन |
| १८.५ पेक्षा कमी | कमी वजन |
| १८.५ – २४.९ | नॉर्मल / हेल्दी वजन |
| २५ – २९.९ | जास्त वजन आहे |
| ३० – ३४.९ | लठ्ठपणा (वर्ग १) |
| ३५ – ३९.९ | लठ्ठपणा (वर्ग २) |
| ४० पेक्षा जास्त | गंभीर लठ्ठपणा (वर्ग ३) |
महिलांचं वयानुसार उंची आणि वजन किती असावे?
| वय (वर्षे) | उंची (सेमी) | वजन (किलो) |
| १८-२५ | १५०-१५५ | ४५-५८ |
| १८-२५ | १६०-१६५ | ५०-६३ |
| १८-२५ | १७०-१७५ | ५५-६८ |
| २६-३५ | १५०-१५५ | ४८-६२ |
| २६-३५ | १६०-१६५ | ५३-६६ |
| २६-३५ | १७०-१७५ | ५८-७२ |
| ३६-४५ | १५०-१५५ | ५०-६५ |
| ३६-४५ | १६०-१६५ | ५५-७० |
| ३६-४५ | १७०-१७५ | ६०-७५ |
| ४६-५५ | १५०-१५५ | ५३-६८ |
| ४६-५५ | १६०-१६५ | ५८-७३ |
| ५६-६५ | १५०-१५५ | ५५-७० |
| ५६-६५ | १६०-१६५ | ६०-७५ |
| ५६-६५ | १७०-१७५ | ६५-८० |
उंचीनुसार वजन किती असावे?
| उंची | पुरुषांचे वजन (किलो) | महिलांचे वजन (किलो) |
| ५’०” (१५२ सेमी) | ५२-६२ किलो | ४५-५३ किलो |
| ५’४” (१६२ सेमी) | ५९-७० किलो | ५१-६१ किलो |
| ५’८” (१७२ सेमी) | ६७-८१ किलो | ५८-७० किलो |
| ६’०” (१८२ सेमी) | ७५-९१ किलो | ६५-७८ किलो |
