Akshay Kumar’s Secret Detox Water : काकडी ही आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. अनेक सेलिब्रिटी आणि फिटनेसप्रेमी त्यांच्या आहारात काकडीयुक्त डिटॉक्स पेयाचा समावेश करतात पण अभिनेता अक्षय कुमारला काकडीसह आणखी नैसर्गिक पदार्थांचा समावेश करून डिटॉक्स पेयाचा आनंद घ्यायला आवडते.

अक्षय कुमारच्या फिटनेस सिक्रेटविषयी अनेकदा चर्चा रंगते. त्याच्या फिटनेस मागील रहस्य सांगत त्याने एक खुलासा केला आहे. त्याने त्याच्या एका खास पेयाविषयी सांगितले. आज आपण याच पेयाविशयी जाणून घेणार आहोत.

अक्षय कुमार वयाच्या ५७ व्या वर्षी हेल्दी , फिट राहण्यासाठी पितो खास पेय

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने सांगितले की तो नियमित पोषक तत्वांनी समृद्ध असे पाणी पितो. शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी म्हणजेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर स्वच्छ करण्यासाठी तो हे साधे पाणी पोषक तत्त्वांनी कसे परिपूर्ण करतो, याविषयी त्याने सांगितले.

डिटॉक्स पेयाची बाटली दाखवत अक्षय सांगतो, “हे आपले नॉर्मल पाणी आहे ज्यामध्ये सफरचंद, काकडी आणि पुदिन्याची पाने टाकलेली आहे. हे पाणी खूप स्वच्छ आहे. नियमित ३-४ लिटर पाणी पिणे चांगले आहे. कोणीही हे डिटॉक्स पेय बनवू शकतो. हे बनवायला अगदी सोपे आहे.

काकडी, सफरचंद, पुदिन्याचे डिटॉक्स पेय कसे बनवावे?

अक्षयने सांगितल्याप्रमाणे, घरी डिटॉक्स पेय बनवणे खूप सोपे आहे. हे डिटॉक्स पेय बनवण्यासाठी, काकडी, पुदिन्याची पाने आणि सफरचंदाचे तुकडे हे पदार्थ पाण्यात मिसळा आणि हे पाणी बाटलीमध्ये टाकून फ्रिजमध्ये ठेवा. अक्षयने सांगितल्याप्रमाणे दिवसभर चांगल्या हायड्रेशनसाठी या डिटॉक्स पेयाचा आनंद घ्या. चव आणि फायदे वाढवण्यासाठी तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय कुमारचे डिटॉक्स पेय म्हणजे ताजी फळे, भाज्यांचा समावेश असलेले पाणी. याला कधीकधी फळयुक्त पाणी किंवा फळांच्या चवीने भरलेले पाणी असेही म्हणतात. या पेयामध्ये कमी कॅलरीज असतात. साखरयुक्त पेयांसाठी हे पेय एक निरोगी पर्याय असू शकते आणि चांगल्या हायड्रेशनसह वजन कमी करण्यास सुद्धा मदत करू शकते.