scorecardresearch

अनन्या पांडेसारखी फिगर मिळवायची आहे का? तर अनन्या पांडेच्या फिटनेस सिक्रेट बरोबर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

संतुलित आहार आणि व्यायामाबरोबरच अनन्या तिची फिगर चांगली मेंटेन ठेवते.

lifestyle
अभिनेत्री अनन्या पांडे हिचा सिक्रेट डायट प्लॅन जाणून घ्या.

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या आरोग्यसाठी हेल्दी डायट प्लॅन बरोबरच वर्कआउट रिजीम करत असते. आपल्या सर्वांना माहित आहे की, अनन्या तिच्या फिटनेसबद्दल खूप सतर्क असते, त्यासाठी ती खूप मेहनत देखील करते. तसेच अनन्याला अनेक वेळा जिमवेअरमध्ये स्पॉट करण्यात आलेय. याशिवाय अनन्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वर्कआउटचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अनन्याच्या वर्कआउट सेशनमध्ये योगा, कार्डिओ वर्कआउट्स, वेट ट्रेनिंग आणि डान्स यांचा समावेश असतो. चला तर मग जाणून घेऊयात अनन्या पांडेचा फिटनेस सिक्रेट.

अनन्या पांडे फिटनेस टिप्स

संतुलित आहार आणि व्यायामाबरोबरच अनन्या तिची फिगर चांगली मेंटेन ठेवते. स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभिनेत्री अनन्या पांडे ही कठोर आणि नियंत्रित आहार योजना फॉलो करत असते. त्याचबरोबर ताजे आणि निरोगी अन्न खायला तिला आवडत असतात. जरी अनन्याला बर्गर, चॉकलेट आणि पिझ्झा खाणे आवडत असले तरी ती हे सर्व पदार्थ अगदी मर्यादित खात असते. तसेच मसालेदार आणि तळलेल्या गोष्टी देखील अगदी क्वचित खात असते.

अनन्या पांडे डायट प्लॅन

ब्रेकफस्ट: अनन्या सकाळी नाष्ट्यामध्ये दोन अंडी, कमी फॅट असलेले दूध, त्याचबरोबर साऊथ इंडियन पदार्थ जसे की, उपमा, इडली, डोसा इत्यादी खात असते.

दुपारचे जेवण: अनन्याचे दुपारच्या जेवणात २ रोट्या, ग्रिल्ड फिश किंवा ताज्या भाज्यांचा समावेश असतो.

संध्याकाळचे स्नॅक्स: नट आणि फिल्टर कॉफीचे समावेश असतो.

रात्रीचे जेवण: अनन्याला हिरव्या भाज्या आणि १ चपाती बरोबर कोशिंबीर खायला आवडते.

फळे: अनन्याला दर दोन तासांनी हंगामी फळे किंवा नारळाचे पाणी प्यायला आवडते.

तुम्ही देखील अभिनेत्री अनन्या पांडे हिने शेअर केलेला डायट प्लॅन फॉलो करून तंदुरुस्त रहा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-10-2021 at 15:02 IST

संबंधित बातम्या