Seeds that Support Healthy Digestion : पचनसंस्थेचे आरोग्य याआधी इतकं लक्ष दिले जायचे नाही. पण, आता कमी वयात आरोग्य समस्या जसजशा वाढू लागल्या आहेत, त्यामुळे आपल्यातील बरेच जण पचनसंस्थेकडे लक्ष देऊ लागले आहेत. आता काही पदार्थ विकत घेताना त्यावरचे लेबल, फायबर किती आहे हे तपासून बघायला लागलो आहे. कारण पचन बिघडले की, त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. ऊर्जा कमी होणे, सूज येणे, त्वचेच्या समस्या, मूड बदलणे आदी अनेक समस्या सहन कराव्या लागतात. यासाठी आहार, व्यायाम, पाणी पिणे, आपण रोज काय खातो सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. इंटरमिटेंट फास्टिंग पेक्षा रोजचा योग्य आहार अधिक महत्त्वाचा असतो. कधी कधी अगदी लहान दिसणारे पदार्थही मोठा फायदा देतात. उदाहरणार्थ, बिया (उदाहरणार्थ – जवस, चिया, तीळ). आकाराने लहान असल्या तरी या बिया पचन सुधारण्यासाठी आणि गट हेल्थसाठी खूप उपयुक्त असतात.

नैसर्गिकरित्या आतड्यांची मदत करणाऱ्या बिया

२४ फेब्रुवारी रोजी शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रशिक्षित कॅलिफोर्नियातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी तीन बियांबद्दल माहिती दिली आहे, ज्या पचनासाठी विशेषतः फायदेशीर ठरतात. केवळ आधार देणारेच नाही, तर “ब्रशसारखे स्वच्छ करण्यास” मदत करतात.

१. चिया सीड्स

डॉक्टर सेठी म्हणतात आतड्यांसाठी अनुकूल अन्नाच्या यादीत चिया सीड्स वरच्या स्थानावर असतात. मुख्यत्वे त्यांच्या विरघळणाऱ्या फायबरच्या घनतेमुळे. चिया सीड्स विरघळणाऱ्या फायबरने भरलेले असतात आणि भिजवल्यावर जेल तयार करतात. जेलसारखे पोत पचनाच्या संबंधित अनेक भूमिका बजावतात. आतड्यांमध्ये साखरेचे शोषण हळूहळू होण्यास मदत करते, चांगल्या जीवाणूंना (beneficial microbiota) अन्न पुरवते. यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारते. फायबर पाण्यात फुगते, मल मऊ होतो आणि पोट नियमित साफ होणे सोपे होऊन जाते. फक्त डॉक्टरांनी, सेवनाचा एक पद्धत सांगितली आहे, जी तुम्ही फॉलो केली पाहिजे. चिया सीड् किमान १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा. रात्रभर भिजवून ठेवल्याने पोत आणि पचन उत्तम राहते. एक ते दोन चमचे बदामाच्या दुधात किंवा दह्यात भिजवून, तुम्ही फायबरयुक्त नाश्ता करू शकता.

२. जवसाच्या बिया

दिसायला लहान असल्या तरीही या बियांमध्ये अनेक समस्या दूर करण्याची ताकद असते. या बियांमध्ये ओमेगा-३ कॅन्टेन्ट, एएलए किंवा अल्फा-लिनोलेनिक ॲसिडम भरपूर प्रमाणात असते, हे फॅटी ॲसिड शरीरातील सूज (inflammation) कमी करून, आतड्यांमध्ये जळजळ होत असेल, तर ती शांत करण्यास मदत करतात. यामुळे अप्रत्यक्षपणे गट हेल्थ सुधारते आणि पचनसंस्था अधिक निरोगी राहण्यास मदत होते. पण, महत्वाचा मुद्दा म्हणजे शोषण. अनेकदा तशाच पचनमार्गातून बाहेर पडतात. त्यामुळे त्यातील सगळे पोषक घटक शरीराला पूर्णपणे मिळत नाहीत. म्हणूनच जवसाच्या बिया भरडून (बारीक करून) खाल्ल्या तर जास्त फायदा होतो. भरडल्यावर त्यातील ओमेगा-३, फायबर आणि इतर पोषक घटक शरीराला नीट शोषता येतात. यामुळे पोटफुगी, कोलेस्टेरॉल व्यवस्थापनास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा स्मूदी किंवा ओटमीलमध्ये एक चमचा कुस्करलेले जवस घालण्याची शिफारस केली जाते.

३. पचनक्रियेला थंडावा देणाऱ्या तुळशीच्या बिया

तुळशीच्या बिया, ज्यांना सब्जा म्हणून ओळखले जाते. या दिसायला अगदी चिया सीड्स सारख्या असतात. पण, चिया सीड्स थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करतात. या बिया थंड असल्यामुळे त्याचा पचनक्रियेवर उल्लेखनीय परिणाम होतो. चिया सीड्सप्रमाणेच तुळशीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यातच पाण्यात भिजवल्यावर त्या अगदी जेल सारख्या होतात. पचनक्रिया शांत करण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वापरल्या जातात. फायबर वाढवण्यासाठी डॉक्टर सेठी ओटमील, बदाम दूध किंवा बदाम दहीमध्ये चियासह तुळशीच्या बिया एकत्र करून खाण्याचा सल्ला देतात.