अतिउत्साह, अतिदु:ख किंवा अतिआनंदाने झोपेची पर्याप्त उपलब्धी न होणे आता सर्वव्यापी समस्या बनली आहे. मानसिक, शारीरिक कारणांखेरीज मेंदूच्या तळाशी असलेली विशिष्ट प्रकारची जोडणी झोप येण्यास वा न येण्यास कारणीभूत ठरत असल्याचे नव्याने उघडकीस आले आहे. यामुळे मानसशास्त्र तसेच शरीर अभ्यासाच्या शाखेला मोठा फायदा होणार आहे.   झोपेशी संबंधित मेंदूतील जोडणीचा हा विशिष्ट बिंदू सस्तन प्राण्यांच्या मेंदूत असतो व त्यामुळे त्यांना गाढ झोप लागते. मेंदूतील झोप उत्तेजक अशा क्रियांपैकी निम्म्या क्रिया ‘पॅराफेशियल झोन’ या भागात घडत असतात. मेंदूचे मूळ म्हणून ओळखला जाणारा भाग श्वासोच्छ्वास, रक्तदाब, हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान या इतर महत्त्वाच्या घटकांचेही नियंत्रण करीत असते, असे हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन व बफेलो स्कूल ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड बायोमेडिकल सायन्सेस या संस्थांच्या संशोधकांनी स्पष्ट केले.
माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींशी झोपेच्या या केंद्राचा फार महत्त्वाचा संबंध आहे. मेंदूतील गॅमा-अमिनोब्यूटिरिक आम्ल हा न्यूरोट्रान्समीटर तयार करणारे न्यूरॉन पॅराफेशियल झोन या भागात असतात. या न्यूरॉन्सचे नियंत्रण करता येते, असे यूबी स्कूल ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड बायोमेडिकल सायन्सेस या संस्थेच्या प्राध्यापक कॅरोलिन इ बास यांनी सांगितले.

फायदा काय?
 पॅराफेशियल झोनमधील जीएबीए न्यूरॉन कार्यान्वित केल्यानंतर प्राणी लगेच गाढ झोपी जातात. त्यासाठी त्यांना झोपेची कुठलीही औषधे द्यावी लागत नाहीत. या न्यूरॉन्सच्या मदतीने झोपणे व उठण्याचे चक्र कसे नियंत्रित केले जाते, त्याचा मेंदूतील इतर भागांशी कसा समन्वय असतो याचा अभ्यास मात्र अजून होणे बाकी आहे. निद्रानाशावर नवीन औषधे तयार करण्यासाठी त्यामुळे मदत होणार असून भूलशास्त्रात आणखी सुरक्षित औषधे तयार करता येणार आहेत. नेचर न्यूरोसायन्स या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
  या न्यूरॉन्सला चालू-बंद करता येते. या प्रयोगात अचूकता आणण्यासाठी प्रयोगांमध्ये मेंदूतील रचनेत फरक न करता जीएबीए न्यूरॉन्सना कार्यान्वित करील असा डिझायनर रिसेप्टर असलेला विषाणू पॅराफेशियल झोन या भागात सोडण्यात आला होता-
–  पॅट्रिक फुलर,  हार्वर्डचे प्राध्यापक.
 

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान