स्तनाच्या कर्करोगाचे निदान MRI तपासणीने होतेय अचूक

निरोगी स्तनातील उती व कर्करोग झालेल्या स्तनातील उती यांचा तुलनात्मक अभ्यास

(सांकेतिक छायाचित्र)

चुंबकीय सस्पंदन प्रतिमा चित्रण म्हणजे एमआरआय स्कॅनच्या मदतीने स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणे सोपे जाते असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. या तपासणीत स्तनाच्या क र्करोगास कारण ठरणारी जैविक चिन्हे ओळखण्यास मदत होते. स्लोकन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या संशोधकांनी म्हटले आहे की, निरोगी स्तनातील उती व कर्करोग झालेल्या स्तनातील उती यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता त्यातील फरक निर्माण करणाऱ्या काही जैवखुणा दिसून आल्या. पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी म्हणजे एमआरआय तंत्राने तपासणीत स्तनाच्या दोन्ही नमुना उतींमध्ये असलेले फरक दिसून आले.

स्तनाच्या कर्करोगात त्याचे लवकर निदान झाले तर उपचार सोपे होतात व जीव वाचण्याची शक्यता वाढते. यात मॅमोग्राफी हे एक वेगळे तंत्रही वापरले जाते त्यात क्ष किरणांनी स्तनांची तपासणी केली जाते. त्यातही निदान होते व मृत्यूचे प्रमाण ३० टक्के कमी होते हे खरे असले तरी मॅमोग्राफीला मर्यादा आहेत कारण त्यात संवेदनशीलता कमी असते.

स्तनाच्या उती दाट असतील तर मॅमोग्राफीतील निदान सदोष ठरू शकते. डोरिस लेथनर यांनी म्हटले आहे की, मॅमोग्राफीतील उणिवा दूर करण्यासाठी जैवचिन्हांचा शोध घेण्यासाठी एमआरआय तंत्राचा वापर जास्त प्रभावी ठरतो. १४१ रुग्णांवर मॅमोग्राफी, सोनोग्राफी, एमआरआय यांचा वापर केला असता त्यात एमआरआय तंत्र जास्त फायद्याचे दिसून आले. एमआरआय तंत्राने तपासणीत काही जैविक चिन्हे दिसून येतात त्यामुळे निदान सोपे होते. १४१ नमुन्यात १०० कर्करोगकारक व ४१ कर्करोग नसलेले नमुने यात दिसून आले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Breast cancer and mri for detection nck

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या