Breast Cancer Early Signs: आजकाल जगभरातील अनेक महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाची समस्या वाढताना दिसत आहे. या आजाराची सर्वात गंभीर बाब म्हणजे फार सुरुवातीला याची लक्षणेच लक्षात येत नाहीत आणि फार नंतर उपचार सुरु केल्यास आजार पूर्ण बरा होण्यात बरेच अडथळे येतात. मात्र तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शरीरात आढळून आल्यावर कर्करोगाची तपासणी करून घेणे हिताचे ठरेल. स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ परंतु हे कर्करोगाचे एकमेव लक्षण नाही. याशिवाय, स्तनाच्या कर्करोगाची काही लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे कोणती आणि सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना कसे ओळखावे हे जाणून घेऊयात..

ब्रेस्ट कॅन्सर सुरुवातीच्या काळात कसा ओळखाल?

  • स्तन दाबल्यानंतर दीर्घकाळ डाग
  • स्तन आणि स्तनाग्रांच्या आसपासची त्वचा सोलली जाणे आणि त्यानंतर तिथे झालेली जखम बराच वेळ तशीच राहणे
  • स्तनाग्रांमधून रक्त, पू किंवा चिकट द्रव्य (लाल, तपकिरी किंवा पिवळे) असते
  • स्तनांमध्ये खड्डे पडणे किंवा लहान लहान गाठी दिसणे.
  • स्तनांमधील रक्तवाहिन्या स्पष्टपणे दिसणे

Sex After Heart Attack: हृदयाचे आजार असल्यास शारीरिक संबंध ठेवणे… तज्ज्ञांनी केला महत्त्वाचा खुलासा

chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
  • स्तनाग्र आतल्या बाजूला दबले जाणे
  • स्तनाग्रांच्या आकारात बदल
  • स्तनाच्या आतील दुग्ध ग्रंथी स्पष्टपणे दिसणे.
  • स्तन लालसर होणे
  • स्तना अतिसंवेदनशील होणे.
  • स्तनाच्या त्वचेवर सुरकूत्या दिसणे

यापैकी एक किंवा अधिक लक्षणे असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्तनाचा कर्करोग आहे. स्तनाग्र स्त्राव, उदाहरणार्थ, संसर्गामुळे देखील होऊ शकतो. तुम्हाला यापैकी कोणतीही चिन्हे आणि लक्षणे आढळल्यास संपूर्ण मूल्यांकनासाठी डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या.

Sex Helps In Anti Aging: ‘सेक्स’मुळे मी आजही तरुण; अनिल कपूर यांच्या ‘त्या’ विधानावर डॉक्टरांचं मत जाणून घ्या

अनेक स्त्री रोग तज्ज्ञ महिलांना ब्रेस्ट कर्करोगापासून वाचण्यासाठी स्वतः निदान हाताने स्तनांचे परीक्षण करण्याचा सल्ला देतात, जर आपल्याला सुरुवातीच्या काळात ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षांची माहिती मिळाली व निदान झाले तर वेळीच उपचाराला सुरुवात करून आजार बरा करता येऊ शकतो.

(टीप- वरील लेख माहितीपर आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये, अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)