पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!

पुरुषांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असली, तरी अलीकडच्या काळात त्यामध्ये वाढ होत असल्याचे अमेरिकेत झालेल्या संशोधनात आढळून आले.

पुरुषांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असली, तरी अलीकडच्या काळात त्यामध्ये वाढ होत असल्याचे अमेरिकेत झालेल्या संशोधनात आढळून आले. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील एम. डी. ऍंडरसन कर्करोग केंद्राच्या अहवालानुसार पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हळूहळू वाढू लागलंय. या केंद्रानेच पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे २५०० रुग्ण संशोधनादरम्यान तपासले आहेत.
आपल्यालाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, यासंदर्भात पुरुषांनी जागरूक होणे आवश्यक आहे, यासाठीच हे संशोधन करण्यात आले. गेल्या २५ वर्षांच्या काळात प्रति एक लाख पुरुषांमागे स्तनाचा कर्करोग झालेल्यांचे प्रमाण ०.८६ वरून १.०८ पर्यंत वाढले असल्याचे संशोधनात दिसून आले. महिलांना स्तनाचा कर्करोग झालेल्या तीन लाख ८० हजार रुग्णांचीही या संशोधनात पाहणी करण्यात आली. महिलांच्या तुलनेत पुरुषांना उतारवयात स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर पुरुषांमध्ये या प्रकारच्या कर्करोगाचे निदान होण्यासही बराच उशीर लागतो, असे पाहणीत आढळले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Breast cancer in male on rise

ताज्या बातम्या