जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आई बनता, तेव्हा मातृत्वाशी संबंधित प्रत्येक भावना ही पूर्णपणे नवीन असते. तसेच बाळासंबंधित आईला कोणत्याही कामाचा अनुभव नसतो. ज्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी समोर येतात. यापैकी एक म्हणजे स्तनपान. बाळाच्या जन्मानंतर त्याचे पहिले अन्न म्हणजे आईचे दूध असते. जे त्याच्यासाठी अमृतासमान आहे. जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी १ ऑगस्ट पासून पुढे आठवडाभर साजरा केला जातो. स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील बाळांचे आरोग्य सुधारण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सप्ताहानिमित्त रोझवॉक हॉस्पिटलच्या गाइनॅकोलॉजिस्ट डॉ. शैली आनंद यांच्याकडून जाणून घेऊयात की आईचे दूध हे बाळाचे पहिले अन्न का मानले जाते आणि बाळासाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे.

बाळासाठी स्तनपान महत्वाचे

आईच दूध हे बाळसाठी खूप महत्वाचं आहे. कारण आईच्या दुधामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स असतात. जे बाळाला निरोगी ठेवतात. आईच्या शरीरातील रोगप्रतिकारक घटक काही सामान्य विषाणू/जीवाणूंना अँटिबॉडी बनवतात आणि त्या अँटिबॉडी आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात पोहोचतात. यामुळे नवजात मुलाचे अनेक आजारांपासून संरक्षण होते. तसेच या एंटीबॉडी बाळाचे आयुष्यभर संरक्षण देखील करतात.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

स्तनपान आईसाठी देखील फायदेशीर

स्तनपान केवळ बाळासाठीच नाही तर आईच्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. प्रत्येक आईने आपल्या बाळाला जन्मानंतर काही महिने दूध पाजणे आवश्यक आहे. एका संशोधनानुसार स्तनपान करणारी आई प्रसूतीनंतर तिचं वजन सहज कमी करू शकते. त्याचबरोबर बाळाला स्तनपान केल्याने आईच्या शरीरात दररोज सुमारे ५०० कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे शरीर तंदुरुस्त होते. त्याचप्रमाणे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांचे गर्भाशय इतरांपेक्षा अधिक लवकर आपल्या सामान्य स्थितीत पोहोचते. हे रक्तस्त्राव आणि अशक्तपणाचा धोका देखील कमी करते. अशा महिलांमध्ये संसर्गाचा धोकाही कमी असतो.

माता आणि मुलांमधील भावनिक बंध

नेहमी असे म्हटले जाते की स्तनपानामुळे आई आणि मुलाचे नाते दृढ होते. याला वैज्ञानिक आधार देखील आहे. काही हॅप्पी हार्मोन्स आई आणि मुलाच्या भावनिक बंधनाला दृढ बनवतात. यामुळे प्रसूतीनंतर नैराश्यात जाण्याची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे स्तनपानामुळे आत्मविश्वासाची भावना देखील वाढते. स्तनपान करणारी मुले कमी रडतात असंही संशोधनात समोर आलं आहे.

स्तनपान आणि रोग प्रतिबंध

स्तनपान करणार्‍या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, अस्थिरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी असतो. आईचं दूध पिणार्‍या बाळांमध्ये अतिसार, बद्धकोष्ठता आणि अकाली नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिस सारख्या समस्या जास्त उद्भवत नाही. त्याचप्रमाणे त्यांची श्वसन प्रणाली देखील चांगली राहते. यामुळे लहान मुलांना सर्दी, न्यूमोनिया किंवा अशा इतर आजार होण्याची शक्यता कमी असते.