नवी दिल्ली : दरवर्षी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागितक स्तनपान आठवडा साजरा करण्यात येतो. स्तनपानासाठी प्रोत्साहन देणे हा त्याचा मूळ हेतू असून बालक आणि आईला यामुळे होणाऱ्या लाभाच्या माहितीबाबत जागृती निर्माण करण्याचाही हा प्रयत्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यएचओ)म्हणण्यानुसार स्तनपानाचे एक दोन नव्हे तर, अनेक फायदे आहेत. आईचे दूध हे बालकांसाठी सर्व आवश्यक पोषक तत्त्वांचा खजिना असतो, असेही ‘डब्ल्यएचओ’ने स्पष्ट केले आहे.

स्तनपानाचे फायदे :

* गरोदरपणात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी स्तनपान महत्त्वपूर्ण आहे.

* मुलाच्या जन्माच्या काळात आईच्या शरीराचे नुकसान होते. ते भरून काढण्याचे कामही स्तनपानामुळे होते.

* स्तनपानामुळे हाडे कमकुवत होणे आणि हृदयासंबंधी आजाराचा धोकाही कमी होण्याची शक्यता असते.

* महिलांना टाइप दोन मधुमेह, स्तनाचा कर्करोग अशा अजारांचा धोकाही कमी होतो.

* आई आणि मूल यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठीही मदत होते. प्रसूतीनंतरचा तणाव, नैराश्यापासून बचाव करण्यासाठी मदत होते.

* स्तनपानामुळे आईच्या हार्मेान्स संतुलित होते.

* आईच्या चांगल्या झोपेसाठीही फायदा होतो.

* चेहऱ्याचा टवटवीतपणाही टिकून राहण्यासाठी स्तनपान महत्त्वाचे ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breastfeeding also benefits the mother zws
First published on: 02-08-2022 at 04:37 IST