Toyota Innova चा नवा ‘अवतार’, किंमतही बदलली

इनोव्हा ही Toyota ची एमपीव्ही प्रकारातील सर्वाधिक विक्री होणारी लोकप्रिय गाडी

Toyota ने आपली सर्वाधिक विक्री होणारी लोकप्रिय एमपीव्ही गाडी Innova Crysta बीएस6 मानकांसह लाँच केली आहे. BS6 Toyota Innova Crysta च्या पेट्रोल मॉडेलची बेसिक किंमत 15.36 लाख आणि डिझेल मॉडेलची किंमत 16.14 लाख रुपये आहे. ही एक्स-शोरुम किंमत आहे. बीएस6 इंजिन असलेल्या क्रिस्टासाठी बुकिंग घ्यायलाही कंपनीने सुरूवात केली असून पुढील महिन्यापासून या गाडीची डिलिव्हरी सुरू होईल.

बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत बीएस-6 इंजिन असलेल्या इनोव्हा क्रिस्टाची किंमत 1.3 लाख रुपयांपर्यंत वाढलीये. बीएस6 पेट्रोल इंजिन असलेल्या इनोव्हा क्रिस्टाची किंमत व्हेरिअंट्सच्या आधारे 31 हजार ते 63 हजार रुपयांपर्यंत वाढलीये. तर, डिझेल इंजिन मॉडेलच्या किंमतीत 59 हजार ते 1.3 लाख रुपयांपर्यंत वाढ झालीये. याशिवाय इनोव्हा क्रिस्टा टूरिंग स्पोर्ट मॉडेलच्या किंमतीत 41 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

दोन्ही इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स :
बीएस4 मॉडेलमध्ये 2.4-लीटर डिझेल इंजिन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सच्या पर्यायांसह येत होते. तर आता बीएस-6 इंजिन असलेल्या नव्या इनोव्हामध्ये 6-स्पीड ऑटामॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. बीएस6 पेट्रोल इंजिनही 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमैटिक गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन बीएस6 मध्ये अपग्रेड करण्याशिवाय कंपनीने इनोव्हा क्रिस्टामध्ये अन्य काहीही बदल केलेला नाही. याव्यतिरिक्त बीएस-4 मॉडेलमध्ये मिळणारे 174hp पावरसह 2.8-लीटर डिझेल इंजिन आता इनोव्हामध्ये मिळणार नाही. कंपनीने हे इंजिन बंद केले आहे. या इंजिनसह ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bs vi toyota innova crysta launched booking starts know price and all other details sas