‘अभिनंदन 151’ , BSNL चा नवीन प्लान

वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएल प्रयत्नशील

(संग्रहित छायाचित्र)

वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सातत्याने नवनवे रिचार्ज प्लान आणत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीनेआपल्या प्रीपेड प्लान्समध्ये अनेक बदल केले आहेत. कमी किंमतीमध्ये जास्त लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.  आता कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी ‘अभिनंदन-151’ नावाचा नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे.

या प्लानमध्ये प्रीपेड ग्राहकांना दररोज 1 जीबी इंटरनेट डेटा वापरता येईल, तसंच रोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगची सेवा वापरता येईल.  रोमिंग कॉलचा फायदा मुंबई आणि दिल्ली सर्कलमध्ये होणार आहे. 180 दिवस या प्लानची वैधता आहे, मात्र प्लानमध्ये मिळणारे फ्री बेनिफिट 24 दिवसांपर्यंतच वैध असणार आहेत. हा प्लान अॅक्टिवेट करण्यासाठी ग्राहकांना सेल्फ केअर कीवर्ड (SMS PLAN 151) टाइप करुन 123 वर सेंड करणं गरजेचं आहे. पण सध्या हा प्लान केवळ चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलमध्येच उपलब्ध असल्याची माहिती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bsnl abhinandan new prepaid plan at 151 rs sas

ताज्या बातम्या