गेल्या काही दिवसात देशातील नेटवर्क कंपन्यांनी आपल्या प्लानमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे पोर्टिंगचं प्रमाण वाढलं आहे. यासाठी कंपन्या आकर्षक प्लान आणत आहेत. दुसरीकडे सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेडने बर्‍याच दिवसांनंतर सर्वाधिक दिवसाची वैधता आणि अमर्यादित कॉलसाठी योजना लॉन्च केल्या आहेत. जर तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल तर तुम्हालाही या प्लानबद्दल माहिती असायला हवी. त्याचबरोबर बीएसएनएलने काही प्लान सर्कलनुसार लाँच केले आहेत. जे काही राज्यांमध्येच उपलब्ध असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • बीएसएनएलचा २३९९ रुपयांचा प्लान – BSNL च्या या प्लानची किंमत २,३९९ रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला ४२५ दिवसांची वैधता मिळेल. यासोबतच या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज ३ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस उपलब्ध असतील. त्याच वेळी, EROS Now च्या सबस्क्रिप्शनवर फ्री पर्सनल रिंग बॅक टोन (PRBT) चा पर्याय देखील उपलब्ध असेल.
  • बीएसएनएलचा १,९९९ रुपयांचा प्लान – या प्लानमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता, ६०० जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. ही मर्यादा ओलांडल्यानंतर ६० केबीपीएसच्या वेगाने उपलब्ध होईल. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉल्स, १०० एसएमएस दररोज उपलब्ध असतील. याशिवाय EROS Now च्या सबस्क्रिप्शनवर फ्री पर्सनल रिंग बॅक टोन (PRBT) चा पर्यायही या प्लॅनमध्ये उपलब्ध असेल.
  • बीएसएनएलचा १४९९ प्लान – या प्लानमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता, १०० एसएमएस दररोज, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि २४ जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल.

जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडीया यांचा २८ दिवसांचा बेस्ट 4G प्रीपेड प्लान; ओटीटी सब्सक्रिप्शनही मिळणार

  • बीएसएनएलचा ३९७ रुपयांचा प्लान – बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ३०० दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, २ जीबी हाय स्पीड डेटा, १०० एसएमएस प्रति दिन आणि मोफत वैयक्तिक रिंग बॅक टोन (PRBT) मिळेल. हा प्लान फक्त गोवा आणि महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे.
  • बीएसएनएलचा ९९९ रुपयांचा प्लान- बीएसएनएलच्या या प्लानमध्ये २४० दिवसांची वैधता, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि २ महिन्यांसाठी मोफत वैयक्तिक रिंग बॅक टोन मिळेल. दुसरीकडे, बीएसएनएलच्या या प्लानमध्ये तुम्हाला एसएमएस आणि हाय स्पीड डेटा मिळणार नाही.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl has launched plans for maximum day validity and unlimited calls rmt
First published on: 22-12-2021 at 12:29 IST