सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार कंपनी आपल्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर 22 दिवसांच्या वैधतेसह मोफत 5GB हाय-स्पीड डेटा देत आहे. कंपनीच्या मल्टी-रिचार्ज सुविधेद्वारे रिचार्ज करणाऱ्यांना कंपनीच्या या ऑफरचा लाभ मिळेल.

बीएसएनएलच्या 98 रुपये, 99 रुपये, 118 रुपये, 187 रुपये आणि 319 रुपयांच्या एसटीव्ही अर्थात स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सवर ही ऑफर आहे. याशिवाय 186 रुपये, 429 रुपये, 485 रुपये, 666 रुपये आणि 1,999 रुपयांच्या व्हाउचर्सवरही ग्राहकांना मोफत 5GB हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. पण अतिरिक्त डेटाची ही ऑफर जे ग्राहक आपल्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह व्हाउचरची वैधता संपण्याआधी दुसरं किंवा तिसरं रिचार्ज करतील त्यांच्यासाठीच आहे.

ही प्रमोशनल ऑफर 19 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. बीएसएनएलच्या चेन्नई डिव्हिजनने या ऑफरबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली असून देशभरातील सर्व सर्कलसाठी ही ऑफर लागू असेल. बीएसएनएलने जुलै महिन्यापासूनच आपल्या ग्राहकांसाठी मल्टी-रीचार्ज सुविधेची सुरूवात केली आहे. यानुसार ग्राहक आपला अ‍ॅक्टिव्ह प्लॅन संपण्याआधीच अ‍ॅडव्हान्समध्ये अकाउंट रिचार्ज करु शकतात. या प्लॅनशिवाय बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी काही दिवसांपूर्वीत 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटासह (डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 80Kpbs) कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 80 दिवस आहे.