निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सांगितलेलं 'श्रीअन्न' काय आहे? Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या | Budget 2023 Nirmala Sitharaman Speaks About Types Of Millets And Benefits For Diabetes Weigh Loss TB What is Shree Anna | Loksatta

निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सांगितलेलं ‘श्रीअन्न’ काय आहे? Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या

Nirmala Sitharaman Speaks About Millets: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी भारत सरकारच्या पुढाकाराने २०२३ हे “आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष” म्हणून घोषित केले

Budget 2023 Nirmala Sitharaman Speaks About Types Of Millets And Benefits For Diabetes Weigh Loss TB What is Shree Anna
Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

What Is Millets And Benefits To Common People: २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी भारत सरकारच्या पुढाकाराने २०२३ हे “आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष” म्हणून घोषित केले या प्रस्तावाला इतर ७२ देशांनी पाठिंबा दिला होता. आज युनियन बजेटदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुद्धा मिलेट्सचे महत्त्व अधोरेखित केले. सीतारमण यांनी सांगितले की, मिलेट्स म्हणजेच भरडधान्य हे संपूर्ण पोषक आहार आहे. म्हणूनच याला भारतात श्रीअन्न सुद्धा म्हंटले जाते. पण नेमकं श्रीअन्न म्हणजे काय? मिलेट्समध्ये कोणत्या धान्याचा समावेश होतो व त्याचा शरीराला नेमका काय फायदा होणार हे आपण जाणून घेऊयात..

श्रीअन्न/ मिलेट्स म्हणजे नेमकं काय?

गहू-तांदूळ वगळता इतर ज्या धान्यांवरचं नैसर्गिक आवरण भरड करून काढल्यानंतर त्यांचा वापर आहारात करता येतो त्यांना भरडधान्य म्हणतात. पूर्वी उखळ-मुसळ वापरून या प्रकारच्या धान्यांवरील कवच किंवा साळ, साल काढली जात असे. त्यानंतर दगडी जात्यावर दळून त्या भरडीचं पीठ केलं जाई. काळाच्या ओघात उखळ-मुसळाच्या जागी पिठाच्या गिरण्या आल्या. शेती क्षेत्रात आधुनिक संशोधनं आणि वेगवेगळ्या पिकांची सुधारित वाणंही आली. यामुळेच मिलेट्स म्हणजेच भरडधान्य हा प्रकार थोडा मागे पडत गेला.

आणखी वाचा – निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांच्या मोदी-मोदी घोषणांना विरोधकांचं ‘या’ घोषणेने उत्तर

श्रीअन्न/ मिलेट्स मध्ये कोणते धान्य येते?

ज्वारी, बाजरी, राळे, वरई, नाचणी, कोदो, राजगिरा, डेंगळी वगैरे तृणधान्यं भरडधान्यांच्या गटात मोडतात. गहू-तांदूळ ही तृणधान्यात ग्लुटेन घटक असल्याने त्यांचा समावेश भरडधान्यांत करत नाहीत. कोणत्याही भरडधान्यात ग्लुटेन हा घटक नसतो.

आणखी वाचा – Budget 2023 : संसदेत अर्थसंकल्पाचं भाषण करताना निर्मला सीतारमण चुकल्या, सभागृहात एकच हशा, म्हणाल्या, “सॉरी…”

श्रीअन्न/ मिलेट्सचे फायदे काय?

निर्मला सीतारमण यांनी खास अधोरेखित केलेल्या श्रीअन्नाची खासियत म्हणजे यात ग्लूटेन शून्य टक्के असतो. ग्लुटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटिनचा एक भाग आहे हा घटक अनेकांना पचत नाही. किंवा त्याची ॲलर्जी असू शकते. ग्लुटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लुटेनमुळे तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो हा घटक भरडधान्यात नसल्याने शरीराला उत्तम पोषण मिळू शकते. तसेच भरडधान्यांत असणाऱ्या विविध पोषणमूल्यांमुळे मधुमेह, रक्तक्षय रोखण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 12:01 IST
Next Story
गव्हापेक्षा वेगाने पचतात मैद्याच्या पोळ्या! न्यूट्रिशनिस्ट सांगतात डायबिटीज व वजन जास्त असल्यास किती करावे सेवन?