Painful Urination Remedy: टॉयलेट करताना अचानक जाणवणारी तीव्र जळजळ… उठणं-बसणं कठीण होणं… आणि कोणाला सांगताही येत नाही, ही समस्या किती त्रासदायक असते हे फक्त त्याचा अनुभव घेणाऱ्या लोकांनाच ठाऊक. विशेषतः महिलांमध्ये ही वेदना अधिक प्रमाणात दिसते. लघवी करताना जळजळ, टोचल्यासारखी वेदना, वारंवार टॉयलेटला जाणं, लघवी थांबून थांबून होणं अशा अनेक लक्षणांमुळे दैनंदिन जीवनच विस्कळित होतं.

अशाच वेळी… घरच्या घरात उपलब्ध असणारी एक छोटीशी गोष्ट तुमचा हा त्रास चुटकीसरशी कमी करू शकते असं सांगितलं तर? हो! हा कोणताही जादूचा मंत्र नाही… तर शतकानुशतके वापरात असलेला हा चमत्कारिक उपाय आहे. आरोग्य तज्ज्ञांनीही ज्याला सर्वांत सुरक्षित नैसर्गिक उपचार म्हटलं आहे.

जळजळ का होते? धक्कादायक कारणं उघड!

आरोग्य विशेषज्ज्ञ सांगतात की, टॉयलेट करताना जाणवणारी जळजळ आणि वेदना हा त्रास प्रामुख्याने मूत्रमार्गातील संसर्गामुळे (UTI) होतो. घाणेरडे सार्वजनिक टॉयलेट वापरणं, शरीरात पाण्याची कमतरता, असुरक्षित लैंगिक संबंध, दिवसभर लघवी रोखून ठेवणं या सर्व गोष्टी UTIला आमंत्रण देतात. UTI झाल्यावर मूत्रमार्गात सूज येते, जळजळ वाढते आणि टॉयलेट करणेही सहन होत नाही. पण, आता लक्ष द्या… धण्याच्या बियांत दडलाय अदृश्य ‘हीलर’! गुणधर्म ऐकून व्हाल थक्क

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या खास मुलाखतीत लाइफस्टाईल एज्युकेटर अंजली मुखर्जी म्हणतात, “लघवीत जळजळ, वेदना, वारंवार लघवीची इच्छा होणं या सर्व त्रासांपासून धण्याच्या बियांचं पाणी अत्यंत प्रभावी ठरू शकतं. रात्री एक चमचा धण्याच्या बिया एक ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या. दोन-तीन दिवसांत आराम जाणवतो.” याच मताशी सहमती दर्शवत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरा रोडचे डॉ. आशुतोष बघेल सांगतात, “धण्याच्या बिया नैसर्गिक ‘सुपरहीरो’ आहेत, त्यातील प्रतिजैविक (Antimicrobial) गुणधर्म हानिकारक जंतूंना नष्ट करतात आणि संसर्ग कमी करतात. त्यात दाहशामक (Anti-inflammatory) गुणधर्म असून, त्यामुळे UTI ने निर्माण झालेली सूजही कमी होते.”

धण्याच्या बियांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ‘फ्लशिंग इफेक्ट’, म्हणजेच मूत्रमार्गातील विषारी घटक आणि जीवाणू बाहेर काढण्याची त्यांची क्षमता. एक प्रकारे मूत्रमार्गाची नैसर्गिक साफसफाईच!

मदर्स लैप आयव्हीएफ सेंटरच्या संचालिका डॉ. शोभा गुप्ताही याला पूर्ण पाठिंबा देत म्हणतात, “धण्याच्या बिया जीवाणूंच्या वाढीसाठी प्रतिकूल वातावरण तयार करतात, त्यामुळे UTI होण्याची शक्यता कमी होते किंवा झालेला संसर्ग बरा होण्यास मदत मिळते.”

तज्ज्ञ सांगतात – उपाय चांगला; पण काळजीही महत्त्वाची!

धण्याचे पाणी काही प्रमाणात वेदना कमी करू शकतात, जळजळ शांत करू शकतात. परंतु, त्याचबरोबर तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात, हा उपाय वैद्यकीय उपचाराला पर्याय नाही. लक्षणे वाढत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

धण्याच्या बियांचा उपाय कसा कराल?

  • एक ग्लासभर पाण्यात एक चमचा धण्याच्या बिया रात्रभर भिजत ठेवा.
  • सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी गाळून प्या.
  • दोन-तीन दिवसांत आराम जाणवू शकतो.
  • दिवसभर पुरेसं पाणी प्या.

छोटं बी… पण मोठा इलाज!

टॉयलेटच्या जळजळीने त्रासला असाल तर हा उपाय नक्की करून पाहा. दुष्परिणाम नाहीत… शरीराला त्रास नाही… आणि परिणामही लवकर! मूत्रमार्गातील संसर्गावर नैसर्गिक तोडगा म्हणून धण्याच्या बियांच्या या उपायाला आजही तज्ज्ञांकडून मान्यता मिळत आहे.