व्यवसाय असो की नोकरी, प्रत्येकाला त्यात प्रगती हवी असते. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो, पण अनेकदा प्रयत्न करूनही त्याला अपेक्षित यश मिळत नाही. अशा परिस्थितीत बरेच लोक निराश आणि अस्वस्थ होतात. चाणक्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याचा अवलंब केल्यास नोकरी-व्यवसायात प्रगती होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे बरेच लोक आहेत जे आपले काम नशिबावर सोडतात. चाणक्यांच्या मते, ईश्वराने मनुष्याला काम करण्याची गुणवत्ता दिली आहे. अशा परिस्थितीत माणसाने काम करण्यापासून मागे हटू नये. परिणाम काहीही असो, परिश्रमपूर्वक काम केले पाहिजे. चाणक्याच्या मते, कष्टाने दुर्दैवही दूर होते. त्यामुळे कोणतेही काम पूर्ण मेहनतीने करण्याची आवड असली पाहिजे.

चाणक्य नीतिनुसार, जीवनात घेतलेला एक निर्णय आयुष्य बिघडवतो. तसंच आयुष्य घडवू शकतो. अशा स्थितीत कोणताही निर्णय व्यक्तीने गांभीर्याने घेतला पाहिजे. कोणताही निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर अनुभवी लोकांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. त्यानंतर कोणताही निर्णय बुद्धीने व विवेकाने घ्यावा.

आणखी वाचा : Mars Transit 2021 : मेष-वृश्चिक राशीचा स्वामी मंगळाचं राशी परिवर्तन; कोणत्या राशीच्या लोकांना होऊ शकतो फायदा ?

माणसाने त्याच्या कामावर नेहमी प्रेम केले पाहिजे. कामावर विश्वास ठेवणे हे यशस्वी लोकांचे लक्षण आहे. चाणक्य म्हणतात की, कामात कामचुकार केल्याने कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम मिळत नाहीत. असे केल्याने व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय नोकरी शोधणाऱ्यांचीही कामाच्या ठिकाणी वाईट प्रतिमा असते. चाणक्य नीतीनुसार नोकरीत प्रगती आणि व्यवसायात आर्थिक लाभासाठी कामाशी एकनिष्ठ राहणे आवश्यक आहे.

आणखी वाचा : Solar Eclipse 2021 : 2021 चे शेवटचे सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?

चाणक्यांच्या मते, पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा. नाहीतर कमवलेला पैसाही पाण्यासारखा वाहून जातो. पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासोबतच त्याचा धार्मिक कार्यातही वापर करावा. यामुळे नशीब चमकेल आणि कीर्तीही वाढेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Business will shine and day night progress in job also know 4 things of chanakya niti prp
First published on: 01-12-2021 at 20:12 IST