चेहऱ्यावर येणाऱ्या पुरळ किंवा पिंपल्सच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्याबरोबर त्वचेची जळजळ होणे, त्वचेवर पिंपल्समुळे वेदना होणे अशा समस्या देखील उद्भवतात. यावर उपाय करण्यासाठी अनेकजण महागड्या ट्रीटमेंटचा किंवा केमिकल असणाऱ्या प्रोडक्टचा वापर करतात. पण यामुळे कधीकधी त्वचेचे आणखी नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार असे प्रोडक्ट वापरावे.

चॉकलेट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स जास्त येतात असे तुम्ही बऱ्याचवेळा ऐकले असेल. जेव्हा ऑइल ग्लॅन्डमध्ये अतिप्रमाणात सीबम तयार होते तेव्हा पिंपल्स येतात. मग चॉकलेट आणि तेलकट पदार्थांचा याच्याशी संबंध काय आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यांमध्ये काही संबंध आहे का आणि यामुळे पिंपल्स येतात का जाणून घेऊया.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

आणखी वाचा : हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतील ‘या’ गोष्टी; लगेच जाणून घ्या

चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये असणारे काही घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. तसेच डार्क चॉकलेट मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे चॉकलेट खाल्ल्याने पिंपल्स येण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही तुम्हाला जर ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पिंपल्स पासून लवकर सुटका मिळवण्यासाठी डॉक्टर योग्य उपचारांचे मार्गदर्शन करतील.

तेलकट पदार्थ
तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्वचा तेलकट होते आणि त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवते असे मानले जाते. परंतु पिंपल्स सीबम या तेलकट कंपाऊंडमुळे येतात. त्याचा तेलकट पदार्थांशी संबंध नाही. यातील मुख्य बाब म्हणजे तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स येतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)