can Diabetes patient have rice does one day old stale rice helps in controlling blood sugar expert advice | Loksatta

Diabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Blood Sugar Control: आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांच्या माहितीनुसार जर का आपण भात शिळा करून खाल्ला तर त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. नेमका हा दावा काय आहे जाणून घेऊयात

Diabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Should Diabetes Patient Eat Rice

Should Diabetes Patient Eat Rice: मधुमेहाच्या रुग्णांना आहारात भात न समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो, यामागे मुख्य कारण म्हणजे तांदळाचा ग्लाइसेमिक इंडेक्स अधिक असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळेच ज्या पदार्थांचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो त्यांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हे साधं सोपं समीकरण सध्या एका नव्या सर्वेक्षणामुळे चर्चेत आले आहे. आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांच्या माहितीनुसार जर का आपण भात शिळा करून खाल्ला तर त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. नेमका हा दावा काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

मधुमेह रुग्णांना भात पूर्ण बंद करावा लागतो का?

मधुमेह नियंत्रणात ठेवन्यासात स्टार्च असणाऱ्या गोष्टी आहारातून काढून टाकाव्यात असा सल्ला डॉक्टर देतात. भात कुकरमध्ये शिजवताना त्याचा स्टार्च पाण्यात उतरतो व त्याच पाण्यात भात शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होते परिणामी रक्तात स्टार्चचा शिरकाव होतो. यामुळेच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते, मात्र तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर का आपण भात शिजवून थंड करून ठेवला व तो काही वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी खाल्ला तर यामुळे भातातील स्टार्च व ग्लाइसेमिक इंडेक्स कमी होऊन केवळ साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

Healthy Diet Plan: बाजरीचे सेवन सोडवते रोगांचं कोडं; चवीत भारी ‘असा’ ठेवा डाएट प्लॅन

जर आपल्याला भात खायचा असेल तर त्याला डायबेटिज फ्रेंडली बनवायला हवे. म्ह्णूनच आपण सेवन करण्याआधी किमान २४ तास भात शिजवून ठेवावा. तुम्हाला कदाचित ऐकायला विचित्र वाटेल पण केवळ भातच नव्हे तर बटाट्याचे सेवनही या पद्धतीने केल्यास त्यातील स्टार्च कमी होण्यास मदत होते. स्टार्चमुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढते. यामुळेच वजन कमी करण्याच्या प्रवासात स्टार्च युक्त पदार्थ कमीतकमी खाण्याचा साला दिला जातो.

भात व बटाट्यातील स्टार्चचे प्रकार

याशिवाय जर तुम्ही स्टार्च युक्त पदार्थांचे सेवन करणारच असाल तर त्याला डायजेस्टेबल म्हणजेच पचण्यास हलके करण्याची पद्धतही आपण पाहुयात. स्टार्चचे दोन प्रकार असतात, सुपाच्य स्टार्च व प्रतिरोधी स्टार्च. यातील सुपाच्य स्टार्च हा शरीरात लगेच विरघळतो व त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, दुसरीकडे प्रतिरोधी स्टार्च हा आपल्या शरीरात लगेच विरघळत नसल्याने रक्तातील साखर वाढू देत नाही. उलट हा एक उत्तम प्रिबायोटिक म्हणूनही काम करतो .

Blood Sugar Level Per Age: तुमच्या वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती असायला हवे? पाहा ‘हा’ तक्ता

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शिळ्या भाताचे सेवन व ग्लुकोज वर नियंत्रण ठेवून आपण मधुमेह असतानाही आपले आवडते पदार्थ खाऊ शकता. याविषयी आपणही आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते?

संबंधित बातम्या

बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके?
तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; वेळीच करा ‘हे’ उपाय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IPL 2023 Auction: ५५ खेळाडूंवर लागणार करोडोंची बोली; तर दोन-दीड कोटीच्या गटात एकाही भारतीयाला स्थान नाही
गणेश नाईक यांना दिलासा? बलात्काराच्या आरोपासह आणखी एक प्रकरणात पुरावे सापडले नसल्याचा पोलिसांचा अहवाल
“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप
स्वत:ची आत्महत्या करुन त्याला बुडवायचे होते २ कोटी अन् प्रेयसीसोबत थाटायचा होता संसार, पण…
पुणे: पीएच.डी. संशोधन केंद्रांतील गैरप्रकारांना चाप?