scorecardresearch

Blood sugar: बटाटे खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढते का? जाणून घ्या यामागील कारण

बटाट्याचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी वाढवतात

बटाट्यातील कर्बोदके रक्तातील साखर वाढवू शकतात. (photo credit: indian express)

आपल्या सर्वांना बटाट्याचे पदार्थ खायला खूप आवडतात. बटाटा हा आपल्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय आपल्या जेवणाच्या थाळीची चव अपूर्ण राहते. बटाट्यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

इतक्या गुणांनी समृद्ध असलेल्या बटाट्याचे सेवन मधुमेह असलेल्या रुग्णांना करता येईल का? असा प्रश्न अनेकदा मधुमेह असलेल्या रुग्णांना पडतो. मधुमेह असलेले रुग्ण त्यांचा आहार अतिशय काळजीपूर्वक घेतात. ते त्यांच्या आहारात अशा पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

बटाट्यातील कर्बोदके रक्तातील साखर वाढवू शकतात

बटाटा उच्च ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येतो, ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी बटाटे खाणे टाळावे. WebMD.com नुसार, बटाट्याचे सेवन केल्यास मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्स साध्या साखरेच्या रूपात रक्तात मिसळतात आणि रक्ताभिसरण करत राहतात, ज्यामुळे रक्तातील साखर दीर्घकाळ वाढते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची काळजी न घेतल्यास रुग्णाला हृदयविकाराचा झटका, किडनी आणि दृष्टीदोष होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना कर्बोदकयुक्त असलेले बटाटे न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

बटाट्याचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी वाढवतात

ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ मधुमेह रुग्णांनी सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. तसेच ग्लायसेमिक लोड हे किती उच्च असेल हे जाणून घेण्यास मदत करतात. इतर पदार्थांपेक्षा बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे आहारतज्ञ मधुमेह रुग्णांना आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा समावेश करण्यास सांगतात.

मधुमेह असलेल्या रुग्णांना जर बटाटे खाण्याची इच्छा झाली तर त्यांनी बटाटे खाण्याची पद्धत बदलावी. बटाटे शिजवल्यानंतर आणि थंड केल्यानंतर बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स २५ ते २८ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. तसेच बटाट्यामध्ये लिंबाचा रस मिक्स केल्यास त्यातील इंडेक्स कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने मधुमेह असलेल्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन करावे.

मधुमेह रुग्णांसाठी ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण किती जास्त असते

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स – २० आणि त्यापेक्षा जास्त असते.

मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स- ११ ते १९ इतके प्रमाण असते.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स- १० आणि त्यापेक्षा खाली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can diabetic patient eat potato knows how its effect on blood sugar scsm

ताज्या बातम्या