Can Diabetic Patients Eat Peanuts: हिवाळ्यात शेंगदाणे आवर्जून खाल्ले जातात. प्रत्येकाला शेंगदाण्यांची चव आवडतेच. शिवाय यामध्ये असंख्य पोषक घटक असतात. शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि गुड फॅट असते, ते आरोग्याला असंख्य फायदे देतात. असं असलं तरी डायबिटीज रूग्णांना शेंगदाण्यांबद्दल अनेकदा गोंधळ होतो. अनेक जण शेंगदाणे खाणे टाळतात, कारण त्यांना भीती वाटते की ते त्यांच्या साखरेची पातळी वाढवेल. तर आता प्रश्न असा आहे की, डायबिटीज असणाऱ्यांनी शेंगदाणे खावेत की नाही? खासगी रूग्णालयातील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. यादव यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

डायबिटीज रूग्ण शेंगदाणे खाऊ शकतात का?

तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात डायबिटीजचे रूग्णदेखील शेंगदाणे खाऊ शकतात. शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त १४ इतका असल्याने शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. शिवाय, शेंगदाणे निरोगी फॅट आणि प्रथिनांनी समृद्ध असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशी आहेत.

डायबिटीज रूग्ण शेंगदाणे खाऊ शकतात, मात्र त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञ याबाबत सल्ला देतात की, दिवसातून ५० ग्रॅम पर्यंत साल नसलेले शेंगदाणे खाऊ शकतात. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो आणि साखरेची पातळी वाढू शकते. तसंच खारे शेंगदाणे खाणं डायबिटीजच्या रूग्णांनी आवर्जून टाळा, शिवाय त्याच्यासोबत गोड पदार्थ खाणंही टाळा.

अनेक जण शेंगदाणे खाणं टाळतात कारण त्यांना भीती वाटते की त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती असते. मात्र, शेंगदाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे त्याचे सेवन करणं गरजेचं आहे. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, ते मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.