How Onions Can Benefit for Skin: त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेकदा बाजारात उपलब्ध रसायनयुक्त पदार्थ वापरतो. यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. अशावेळी घरगुती उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. केवळ आयुर्वेदच नाही तर कांदा त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही रुपात याला वापरत असाल ते त्वचेसाठी फायदेशीर आहे.

कांदा किंवा कांद्याचा रस त्वचेच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे केसांचे तसेच त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का कांद्याच्या रसाचे देखील दुष्परिणाम होऊ शकतात?

how Screaming is good for your health
Screaming : ‘किंचाळणे’ किंवा ‘ओरडणे’ आपल्या आरोग्यासाठी आहे चांगले; घ्या जाणून तज्ज्ञांनी सांगितलेले कारण…
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

कांद्याचे गुणधर्म काय आहेत? Properties of onion?

कांदे हे एलियम वनस्पती कुटुंबातील सदस्य आहेत. या वनस्पती कुटूंबात लसूण, shallots, leeks आणि chives देखील समाविष्ट आहेत. हेल्थ लाईनवर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. बरेच लोक त्यांच्या प्रीबायोटिक गुणधर्मांसाठी कांदे खातात, जे पचन सुलभ करू शकतात आणि तुमच्या कोलनमध्ये निरोगी मायक्रोबायोम वाढवू शकतात. दुसरीकडे, दुसर्‍या संशोधनानुसार, कांद्यामध्ये सल्फर घटकासह सेलेनियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात.

( हे ही वाचा: कोणतीही औषधे न घेता वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल झपाट्याने कमी? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

कांद्याचा रस त्वचेसाठी फायदेशीर आहे का? Is onion juice beneficial for the skin?

हेल्थ लाईनच्या मते, २०१६ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, कांद्याच्या अर्कामध्ये म्हणजेच रसामध्ये बहुतांश प्रकारच्या जीवाणूंवर तटस्थ गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. त्वचेवर असलेले बॅक्टेरिया जे सूज वाढवण्याचे काम करतात ते कांद्याच्या रसाच्या प्रभावाने नष्ट केले जाऊ शकतात. यासोबतच कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते. व्हिटॅमिन सी तुमच्या सेल टर्नओव्हरचा वेग वाढवण्यासाठी ओळखले जाते, जे ब्रेकआउट कमी करण्यास, लालसरपणा कमी करण्यास आणि तुमची त्वचा उजळ करण्यास मदत करू शकते. कांद्यामध्ये नैसर्गिकरीत्या सल्फ्यूरिक ऍसिड देखील असते. डाइलूटेड सल्फर काही प्रकारच्या मुरुमांवर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

कांद्याचा रस त्वचेवर कसा वापरावा? Best way to use onion oil on your skin

हेल्थ लाइनच्या मते, त्वचेच्या निगा राखण्यासाठी कांद्याचा वापर करताना, उच्च अँटिऑक्सिडंट्सचे फायदे मिळवण्यासाठी आतील भाग वापरण्यापेक्षा बाहेरील साले वापरा. मुरुमांच्या डागांवर कांद्याचा वापर करण्यासाठी, कांद्याचा एक छोटा तुकडा कापून घ्या, हलका किसून घ्या आणि किसलेला कांदा तुमच्या डागांवर किंवा पिंपल्स आलेल्या भागावर स्वच्छ बोटांनी घासून घ्या. कांद्याच्या वासापासून सुटका होण्यासाठी नंतर हात साबणाने धुवा.

दुसरीकडे, कांद्याचा अर्क कोणत्याही डागांवर उपचार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे कांद्याचा अर्क कोरफड जेलमध्ये मिसळल्यास त्याचा परिणाम लवकर आणि चांगला दिसून येतो. कारण कोरफडीमध्ये त्वचेच्या जखमा आणि डागांवर उपचार करण्यासाठी चांगले गुणधर्म आहेत. यासाठी, सुमारे १ चमचा ताजे पिळून काढलेल्या कांद्याचा रस १ चमचा शुद्ध कोरफड जेल मध्ये मिसळा आणि हे जेल डागांवर लावा. लावल्यानंतर १० मिनिटे तसंच पाहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि मॉइश्चराइझ लावा.

( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता)

कांद्याच्या रसाचे दुष्परिणाम? Possible side effects of onion oil

त्वचेवर कांद्याचा रस वापरण्याशी संबंधित अनेक दुष्परिणाम नाही आहेत. तरीही कांदे खाताना तुम्हाला ऍलर्जी असण्याची शक्यता असेल तर तुम्ही तुमच्या मनगटाच्या आतील बाजूस थोड्या प्रमाणात कांद्याचा रस लावून पॅच टेस्ट करू शकता आणि लालसरपणा किंवा जळजळ होतेय का हे पाहण्यासाठी २४ तास प्रतीक्षा करा.