scorecardresearch

Health Tips: चांगली झोप येण्यासाठी मुठभर पिस्ता खाणे फायदेशीर? आयुर्वेद काय सांगते, जाणून घ्या

पिस्ता खाल्ल्यामुळे गामा लहर प्रतिसाद निर्माण करतात.

can pistachios help you sleep better heres what ayurveda says
पिस्ता चांगल्या झोपेसाठी फायदेशीर (संग्रहित फोटो)

बदलती जीवनशैली आणि कामाच्या व्यस्त टाइमटेबलमुळे अनेकजण तणाव, चिंता आणि इतर आरोग्य समस्यांचा सामना करत आहे. याचा झोपेवरही विपरित परिणाम होत आहे. जर तुम्हीही कामामुळे सतत तणावाखाली, चिंतेत असाल तर तुम्हाला झोपेसंबंधीत विकारांची लक्षणं जाणवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाला निरोगी राहण्यासाठी रोज किमान ७ ते ८ तासांची झोप गरजेचीच असते. केवळ बदलत्या जीवनशैलीचाच नाही तर आहारातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. पण झोपेसंबंधीत आजारांपासून तुम्हाला दूर राहायचे असेल तर रोज रात्री मुठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरते का? याबाबत आयुर्वेदात काय सांगितले आहे जाणून घ्या.

आहारात काही फळ, भाज्या, सुका मेवा आणि बियांचा मुबलक प्रमाणात समावेश असेल तर तुम्ही झोपेच्या समस्यांपासून दूर राहू शकतात. पण पिस्ता हा शांत झोपेसाठी एक सर्वोत्तम पदार्थ ठरला आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांनी रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी पिस्ता हा एक जादुई औषध असल्याचे म्हटले आहे.

डॉ. दिक्षा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, पिस्त्यामध्ये मेलाटोनिनचे प्रमाण सर्वाधिक असते ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते. कारण मेलाटोनिन तुम्हाला लवकर शांत झोप लागते. ज्यामुळे आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते. तसेच शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारते शिवाय विविध आजार रोखता येतात.

पिस्त्याचे सेवन केल्याने शरीराला मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 मिळते. मॅग्नेशियममुळे तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच झोपेवर आणि व्हिटॅमिन बी 6 वर परिणाम करणाऱ्या गामा, ट्रिप्टोफॅन आणि सेरोटोनिनचे उत्पादन सुलभ करते. सेरोटोनिनचे उत्पादन ट्रायप्टोफॅन या अमिनो आम्लावर अवलंबून असते. ज्याला हॅप्पी हार्मोन्स म्हणतात, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा मूड स्थिर राहण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार- पिस्त्यामध्ये वात-शमक, गुरू आणि उष्णता असते, ज्यामुळे पिस्ता चिंताग्रस्त, निद्रानाश, अनाठायी अन्नाची लालसा आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी सर्वोत्तम आहेत. यामुळे भूक, लैंगिक शक्ती, मूड आणि झोपेचे आरोग्य देखील सुधारते. पिस्ता ह्रदयविकारावरही चांगला मानला जातो.

यामुळे डॉ. दिक्षा यांनी सल्ला दिला की, चांगली झोप लागत नाही त्यांनी झोपण्याच्या १ तास आधी मूठभर पिस्ते खावेत. मॅग्नेशियम आणि मेलाटोनिनच्या गोळ्यांवर अवलंबून राहू नये.

निद्रानाश, अशांत झोप, अतिविचार आणि चिंताग्रस्त लोकांसाठी आयुर्वेदिक डॉक्टर ब्राह्मी, अश्वगंधा, जटामांसी, तगर, शाखपुष्पी यासारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि इतर तणाव कमी करणारी आणि झोप वाढवणारी औषधी वनस्पती दूध किंवा पाण्यासोबत झोपण्याच्या आधी खाण्याची शिफारस करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या