Can Soy Cause Breast Cancer :गेल्या कित्येक वर्षांपासून, टोफू, सोया दूध आणि हिरवे सोयाबीनचे दाणे (edamame) यांसारखे सोयाबीन आधारित पदार्थांचा आरोग्यावर होणारा परिणामाबाबत एक तीव्र वादाचा मुद्दा ठरत आहे. विशेषतः सोयाबीन आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोग यांच्यातील संबध आणि संभाव्य धोक्याबाबत ही चर्चा सुरु आहे.
भारतासह अनेक अशियाई देशांमध्ये, सोयाबीन हा रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण अलीकडे त्याचा स्तनाच्या कर्करोगाशी असलेल्या संबंधाबद्दल बराच संभ्रम निर्माण झाला आहे. ही चिंता वाढण्याचे मुख्य कारण ही वस्तूस्थिती आहे की, सोयाबीनमध्ये आयसोफ्लाव्होन्स( isoflavones) नावाची संयुगे आढळतात. त्यांना अनेकदा “वनस्पती इस्ट्रोजेन”(plant estrogens) असेही म्हणतात.
वनस्पती इस्ट्रोजेन (phytoestrogens) म्हणजे वनस्पतींमध्ये आढळणारे नैसर्गिक घटक जे शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनसारखे अंशतः कार्य करतात किंवा त्याच्या रिसेप्टर्सवर प्रभाव टाकतात. हे इस्ट्रोजेन(estrogens) काही विशिष्ट प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीमध्ये भूमिका बजावत असल्यामुळे अनेकांना असे वाटते की, ‘सोयाबीनचे सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.’ पण, आधुनिक वैज्ञानिक संशोधन वेगळेच चित्र मांडते.
सोयाबीन आणि आयसोफ्लाव्होन्स यांचा संबध समजून घ्या( Understanding soy and isoflavones)
सोयाबीनमध्ये आढळणारे आयसोफ्लाव्होन्स( isoflavones) हे फायटोइस्ट्रोजेन्स(Phytoestrogens)च्या वर्गातील आहेत, म्हणजेच ते वनस्पतींपासून मिळणारे असे संयुगे आहेत ज्यांची रासायनिक रचना मानवी इस्ट्रोजेनसारखी (Human estrogen-like)असते. या साम्यामुळे,ते शरीरातील इस्ट्रोजेन रिसेप्टर्सशी जोडले जाऊ शकतात. इस्ट्रोजेन रिसेप्टर्स म्हणजे इस्ट्रोजेन हार्मोनला बांधून शरीरातील पेशींना त्यानुसार कार्य करण्याचा सिग्नल देणारा प्रोटीन आहे. मात्र, सोयाबीनमध्ये आढळणारे आयसोफ्लाव्होन्सची क्रिया नैसर्गिक इस्ट्रोजेनपेक्षा लक्षणीयरीत्या कमकुवत असते. खरं तर, आयसोफ्लाव्होन्स हे निवडक इस्ट्रोजेन रिसेप्टर मॉड्युलेटर म्हणून काम करू शकतात, म्हणजेच ते संदर्भानुसार इस्ट्रोजेनची नक्कल करू शकतात किंवा त्याला अवरोधित करू शकतात.
सोयाबीनमुळे कर्करोगाचा धोका का वाढत नाही? (Why soybeans don’t increase cancer risk)
सोयाबीनमुळे कर्करोगाचा धोका का वाढत नाही हे समजून घेण्यासाठी ही दुहेरी कार्यपद्धती महत्त्वाची आहे. इस्ट्रोजेनच्या क्रियेला अतिउत्तेजित करण्याऐवजी, आयसोफ्लाव्होन्स स्तनांच्या ऊतींसहित काही विशिष्ट ऊतींमधील एकूण इस्ट्रोजेनिक प्रभाव प्रत्यक्षात कमी करू शकतात.
फर्नांडिस हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख आणि मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. लथा शशी TOI ला माहिती देताना सांगतात की, “इतर कोणत्याही कडधान्यांच्या तुलनेत सोयाबीन या एकाच बीमध्ये उच्च-गुणवत्तेचे प्रथिने आणि तेल यांचे केंद्रित मिश्रण आहे. त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.”
काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की,’सोया आणि आयसोफ्लाव्होनचे सेवन वाढल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. यामुळे अँटिऑक्सिडंट क्रिया वाढते आणि दाहक संकेत कमी होतात.’
रजोनिवृत्तीनंतर(मेनोपॉज) महिलांमध्ये सोया आयसोफ्लाव्होनमुळे स्तनाच्या कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका २६% ने कमी होतो, ज्याचा सर्वाधिक परिणाम दररोज सुमारे ६० मिग्रॅ आयसोफ्लाव्होनच्या सेवनाने दिसून येतो, जे अंदाजे सोया पदार्थांच्या दोन ते तीन सर्व्हिंगइतके आहे. सोया आयसोफ्लाव्होन इस्ट्रोजेन रिसेप्टर्सशी कमकुवतपणे जोडले जातात आणि अस्थी पेशीं (Bone cells)च्या वाढीस चालना देऊन हाडांची झीज रोखण्यास मदत करू शकतात. हा गुणधर्म रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसच्या प्रतिबंधासाठी महत्त्वाचा आहे.
विशेषतः जपान आणि चीनसारख्या देशांमधील मोठ्या लोकसंख्येच्या अभ्यासानुसार, ,”जिथे सोयाबीन रोजच्या जेवणात समावेश होतो तिथे सोयामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो याचा कोणताही पुरावा नाही.
खरं तर, काही अभ्यासांनुसार, “ज्या महिला माफक प्रमाणात संपूर्ण सोया पदार्थांचे सेवन करतात, त्यांच्यामध्ये हा धोका किंचित कमी असू शकतो.”
सोयाचा खरंतर संरक्षणात्मक परिणाम होऊ शकतो (Soy can actually have a protective impact)
संशोधन काय सांगते:
मेयो क्लिनिकनुसार, सोयाबीनच्या पदार्थांचे सेवन केल्याने “व्यक्तीचा स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढणार नाही.” खरं तर, लोकसंख्येवर आधारित संशोधन असे सूचित करते की,”सोयाबीनच्या सेवनाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी देखील होऊ शकतो. “
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, “मोठ्या प्रमाणातील पुरावे सोयाबीनच्या पदार्थांच्या सुरक्षिततेला समर्थन देतात,” ज्यामध्ये असे अभ्यास दिसून आले आहेत की, ‘जे नियमितपणे सोयाबीनचे सेवन करतात त्यांच्यामध्ये कर्करोगाच्या धोका वाढत नाही उलट काही प्रकरणांमध्ये तो कमी होतो.
मेटा-ॲनालिसिस हे अनेक संशोधन अभ्यासांचे निष्कर्ष एकत्रित करून तयार केलेले अभ्यास आहे जे उपलब्ध असलेल्या सर्वात मजबूत वैज्ञानिक पुराव्यांपैकी एक मानले जातात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाने अनेक संभाव्य अभ्यासांचे विश्लेषण केले आणि त्यात एक अगदी विरोधाभासी गोष्ट आढळली! त्यात असे आढळले की,’सोया आयसोफ्लाव्होनचे जास्त सेवन स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्याशी संबंधित होते.’
जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनने प्रसिद्ध केलेल्या आणखी एका मोठ्या मेटा-ॲनालिसिसमध्ये असे आढळले की,”सोयापासून मिळवलेले संयुगे स्तनाच्या कर्करोगाची पुनरावृत्ती कमी करण्यास आणि रुग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण सुधारण्यास मदत करू शकतात.’
सुरुवातीच्या अनेक चिंता प्राण्यांवरील अभ्यासांवर किंवा वेगळ्या केलेल्या सोया संयुगांच्या अत्यंत उच्च मात्रांवर आधारित होत्या, जे प्रमाण कोणीही अन्नातून सेवन करेल त्यापेक्षा खूप जास्त होते. पण वास्तविक जीवनातील आहार वेगळा असतो. एक वाटी सोयाबीन, एक ग्लास सोया दूध किंवा टोफूच्या एका भागातून तेवढे अत्यंत जास्त प्रमाण मिळत नाही.
महत्त्वाचे आहे ते त्याचे स्वरूप आणि प्रमाण. टोफू, टेंपेह(Tempeh), हिरवे सोयाबीनचे दाणे(एडामेम) आणि सोया दूध यांसारखे सोया-आधारित पदार्थ सामान्यतः सुरक्षित मानले जातात आणि त्यासह प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात. पण वैद्यकीय सल्ल्याशिवाय, अतिप्रक्रिया केलेले सप्लिमेंट्स(highly processed supplements) किंवा सांद्रित अर्क( concentrated extracts) वापरले जातात किंवा शिफारस केली जाते,” असे डॉ. लथा शशी सांगतात.
स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर सोयाचे सेवन ( Soy consumption after being diagnosed with breast cancer )
अनेक महिलांना हे देखील जाणून घ्यायचे आहे की, ज्या महिलांना स्तनाचा कर्करोग आहे आणि त्या उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी सोया सुरक्षित आहे का. त्यामुळे कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता वाढते का? पूर्वी अशी चिंता व्यक्त केली जात होती की,”सोयामुळे हार्मोन थेरपीमध्ये अडथळा येऊ शकतो, परंतु नवीन संशोधन याला दुजोरा देत नाही.”
खरे तर, मेयो क्लिनिकमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”निदान झाल्यानंतर सोया खाणे तुमच्यासाठी चांगले असू शकते आणि तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर देखील ठरू शकते.”
त्याचप्रमाणे, निरीक्षणात्मक अभ्यासातून असे दिसून येते की, “निदान झाल्यानंतर नियमितपणे सोयाचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता कमी असते आणि जगण्याची शक्यता सुधारते.”
तथापि, बहुतेक तज्ज्ञ उच्च-डोस सप्लिमेंट्सऐवजी संपूर्ण सोया पदार्थांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस करतात, कारण सप्लिमेंट्सवर तितका विस्तृत अभ्यास झालेला नाही.
