scorecardresearch

Premium

Jugaad Video : काय सांगता! टूथपेस्टनी नेल पॉलिश काढता येते; हा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

ऐन वेळी रिमूव्हर संपलं असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर टेन्शन घेऊ नका. एका अनोख्या पद्धतीने तुम्ही नेल पॉलिश काढू शकता. हा घरगुती जुगाड जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

Can Toothpaste Remove Nail Polish
काय सांगता! टूथपेस्टनी नेल पॉलिश काढता येते (Photo : YouTube)

Jugaad Video : स्त्रिया हाताची सुंदरता वाढवण्यासाठी नखांना नेल पॉलिश आवडीने लावतात. नेल पॉलिशमुळे नखं खूप सुंदर दिसतात, पण जेव्हा हेच नेल पॉलिश नखांवरून काढायची वेळ येते तेव्हा खूप त्रास होतो. नेल पॉलिश काढण्यासाठी स्त्रिया नेल पॉलिश रिमूव्हर वापरतात. ऐन वेळी रिमूव्हर संपलं असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर टेन्शन घेऊ नका. एका अनोख्या पद्धतीने तुम्ही नेल पॉलिश काढू शकता. हा घरगुती जुगाड जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

टूथपेस्टनी नेल पॉलिश काढता येते

जर ऐन वेळी नेल पॉलिश रिमूव्हर संपलं असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एका घरगुती वस्तुच्या मदतीने नेल पॉलिश काढता येईल. हो, तुम्ही टूथपेस्टच्या मदतीने नखांवरील नेल पॉलिश काढू शकता. टूथपेस्टचा वापर आपण फक्त दात घासण्यासाठी करतो, पण नेल पॉलिश काढण्यासाठीसुद्धा तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता.

wife cooks anything dish for husband as a dinner
Video : जशास तसे उत्तर! बायकोने ‘काहीही चालेल’वर शोधला तगडा उपाय….
Huge Octopus Climbs On Car Video Viral Makes People Skip Heart Beat Where is This Coming From In Floods Check Reality
..तर गाडीवर हा महाकाय ऑक्टोपस चढणार! Video पाहून लोकांना भरली धडकी; नेमकं काय आहे प्रकरण?
Man Jumps Into Sewer To Save His AirPods
तरुणाचे Apple AirPods गटरात पडले; क्षणाचाही विचार न करता थेट नाल्यात मारली उडी अन्…खतरनाक VIDEO व्हायरल
Little Girl Trying To Click the Lord Bappa Photo Video goes viral
“बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Desi Jugaad : देशी जुगाड! निकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने तोडा झाडावरील फळे, VIDEO एकदा पाहाच!

व्हायरल व्हिडीओ

Hey It’s Honeysuckle या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये टूथपेस्टनी नेल पॉलिश कसे काढायचे, हे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, तरुणी नखांवर टूथपेस्ट लावून नखे घासताना दिसत आहे आणि नंतर पाण्याने नखं स्वच्छ धुताना व्हिडीओमध्ये दिसते आहे. त्यानंतर नखांवर नेल पॉलिश दिसत नाही आणि नखं पांढरे शुभ्र दिसतात.
पुढे व्हिडीओत ती नखांवर लावलेले टूथपेस्ट कापसाने घासण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र तिला नखांवरील नेल पॉलिश काढताना त्रास होतो आणि नेल पॉलिश नीट काढता येत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can toothpaste remove nail polish jugaad video know home made nail polish remover ndj

First published on: 02-10-2023 at 13:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×