मोठा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण हे एक स्लो पॉयजन आहे, जे लोकांना हळूहळू बहिरे बनवते. या बहिरेपणाच्या समस्येला ते लोक बळी पडत आहेत, ज्यांना इअरफोन लावून सतत गाणी ऐकण्याची किंवा फोनवर बोलण्याची सवय आहे .अशा लोकांना दररोज हेडफोन किंवा इअरफोन वापरण्यामुळे होणाऱ्या नुकसानाची कल्पना नसते. गेल्या काही वर्षांत इअरफोन्स आणि इअर बड्स वापरण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

तसंच मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची पद्धतही झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आजकाल अनेक कार्यक्रमांमध्ये सर्रास DJ सिस्टम वापरली जाते. याच्या कर्कश आवाजामुळे अनेकांना हृदयविकाराचे झटके आल्याचंही तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल. सध्या अशाच काही समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे आणि त्याला कारण ठरलं आहे तुमचे इअरफोन. हो त्यामुळे तुम्हाला बहिरेपणाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो असं एका अहवालातून उघडकीस आलं आहे.

Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
What Happens To Body By Drinking One Glass Milk Everyday
एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?

हेही वाचा- रात्री शांत झोप लागत नाहीये? निद्राचक्र सुधारण्यासाठी आजच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

अहवालातून धक्कादायक खुलासा –

चंदीगड पीजीआयच्या ईएनटी विभागाच्या अभ्यासानुसार, स्पीच अँड हिअरिंग युनिटच्या डॉक्टरांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामध्ये ३५ वर्षांखालील तरुणांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याच्या तक्रारी अधिक असल्याचं उघडकीस आलं आहे. तर पाच ते दहा वर्षांपूर्वी ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याच्या समस्या येत होत्या. पण आता हे वयोमान घटले आहे.

दररोज २ तास इअरफोन वापरणे धोकादायक –

हेही वाचा- दररोज एकसारखे अन्नपदार्थ खाणं शरीरासाठी ठरु शकतं घातक, गंभीर आजारांचाही वाढतो धोका? जाणून घ्या

या अहवालानुसार ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाज घातक आहे. शिवाय २४ तासांत २ तास इअरफोनवर गाणी ऐकणेदेखील धोकादायक ठरू शकतं. या संशोधनानुसार, जे तरुण दररोज २ तासांपेक्षा जास्त वेळ मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी ऐकतात, त्यांची ऐकण्याची क्षमता झपाट्याने कमी झाली आहे. मोठ्या आवाजाचा थेट परिणाम माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बरेच तरुण ९० ते १०० डेसिबलच्या आवाजात गाणी ऐकतात. तर या अहवालात, दिवसभरात २ तासांपेक्षा जास्त वेळ इअरफोन वापरू नका असा सल्लाही देण्यात आला आहे.

आकडे काय सांगतात?

हेही वाचा- २०३५ पर्यंत जगभरातील ५० टक्याहून अधिक लोकांना ‘हा’ आजार होणार? तुम्हाला किती धोका कसे राहाल सावध…

२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या इंडियन मेडिकल रिसर्च (IMR) च्या अभ्यास अहवालानुसार, भारतातील प्रत्येक 1१२ पैकी एका व्यक्तीला कानाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर देशातील सुमारे ६.५ टक्के लोकसंख्येची श्रवणशक्ती कमी होत आहे. अशा वेळी तुमच्या आजूबाजूला आवाज, गोंधळाची पातळी ९०-९५ डेसिबल असेल, तर कमी ऐकू येण्याची समस्या उद्भवू शकते. आवाजाची पातळी १२५ डेसिबलपर्यंत पोहोचते तेव्हा कानात वेदना सुरू होतात आणि जर या आवाजाची पातळी १४० डेसिबलपर्यंत पोहोचली तर व्यक्ती बहिरी होऊ शकते. त्यामुळे अशा मोठ्या आवाजात गाणी न ऐकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.