Cancer Symptoms : कॅन्सरचे लवकरात लवकर निदान झाल्यास त्यावर उपाचार करणे शक्य होते. कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्यात दिसणारी काही लक्षणे पटकन ओळखत येऊ शकतात जर ती तुम्हाला माहित असतील तर पण कॅन्सर प्रत्येक व्यक्ती किंवा प्रकारानुसार वेगळ्या प्रकारे लक्षणे दर्शवू दिसू शकतो. कॅन्सरची काही लक्षणे अशी आहेत जी काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास तुम्ही तातडीने डॉक्टरांकडून जाऊ तपासणी केली पाहिजे. याबाबत मेडांता – द मेडीसिटी रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे अध्यक्ष, डॉ. तेजिंदर कटरिया,यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील १० लक्षणांबाबत सांगितले आहे ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.

कॅन्सरची लक्षण हे सहस दुर्लक्षित केली जातात कारण..(Cancer symptoms often remain undiagnosed; here’s why)

कॅन्सरची लक्षणे हे अनेकदा दुर्लक्षित केली जाऊ शकतात कारण ते अनेकदार रोजच्या सामान्य समस्या असल्यासारख्या वाटतात, जसे की, थकवा, पोटफुगी, अचानक येणारी खोकल्याची उबळ. चुकीचा आहार, तणाव, किंवा वृद्धत्वाची लक्षणे समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. याचबरोबर सर्व प्रकारचे कॅन्सर सुरुवातीच्या टप्यामध्ये कोणतीही वेदना जाणवत नाही किंवा धोक्याचे लक्षण दर्शवतनाही. काही लोक डॉक्टरांकडे जाण्याच्या भिती तर काही वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करतात. जरी त्यांनी डॉक्टरांकडून तापसणी केली तरी अस्पष्ट लक्षणे चुकीचे निदान किवा उशीरा निदान केल्यमुळे ओळखली जात नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर, कॅन्सर झाल्यास त्रासदायक लक्षणे सुरुवातीपासून दिसत नाही, ती हळू हळू दिसतात ज्यामुळे शरीराची नियमित तपासणीशिवाय त्यांना ओळखणे अशक्य ठरते.

१) विनाकारण कमी होणारे वजन(Unexplained weight loss)

जर तुम्ही १० पाऊंडपेक्षा जास्त वजन एक महिन्यात कमी केले तर हे पोट, अन्ननलिका, फुफ्फुस, स्वादुपिंडाचा कॅन्सरचे लक्षण आहे. नेहमी इतर कारण शोधण्याचा प्रयत्न करा, तरीही तुम्ही सातत्याने वजन कमी होत असेल तर तुम्ही तातडीने डॉक्टरांना दाखवू शकता.

२) सातत्याने येणार थकवा (Persistent fatigue)

सतत थकल्यासारखे वाटणे,जरी तुम्ही आराम केला तरी तुम्हाल जर थकवा जाणवत असेल तर हे ररक्ताशी संबंधित कॅन्सर जसे ल्यूकेमिया किंवा लिंफोमा बरोबरच अनेक प्रकारच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. तु्म्हालाही कोणत्याही ठोस कारणाशिवाय थकवा जाणवत असेल आणि तुमचे दैनदिन आयुष्य विस्कळीत होत असेल तर तातडीने तपासनी करून घ्या.

३) नवीन किंवा सतत बदलणारी गाठ (A new or constantly changing lump)

नवीन गाठ येणे किंवा काखेत, जांखेत मानेभोवती सुज येणे दाहकता आणि संसर्गाचे लक्षण आहे पण हे असामान्य पेशींच्या वाढीचे देखील लक्षण असू शकते. असू शकते. जर तुम्हाला गाठ कठीण वाटत असेल, कालांतराने ती मोठी होत असेल किंवा ती जात नसेल तर कदाचित हे स्तन, अंडकोष किंवा लिंफसंबंधित कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. नक्की काय समस्या आहे जे समजून घेण्यासाठी तुम्हाल नियमितपण आकार, रूप, आणि स्पर्शाने होणारी वेदना / नाजूकपणा तपासत राहा. शंका वाटल्यास तातडीने तपासणी करून घ्या.

४) त्वचेमध्ये होणारे बदल किंवा तीळ (Changes in skin or moles)

तुमच्या त्वचेला लक्ष ठेवा – नवीन गाठी किंवा ठिपके जे आकार, रंग, किंवा आकारमान बदलतात किंवा रक्तस्त्राव होतो किंवा खाज सुटते, त्यावर विशेष लक्ष द्या. मेलानोमा ओळखण्यासाठी ABCDE नियम खूप महत्त्वाचा आहे: Asymmetry (असममिती), Border (सीमा), Color (रंग), Diameter (व्यास), आणि Evolving (बदल होत असणे)

५) असमान्य रक्तस्त्राव किंवा जखमा(Unusual bleeding or bruising)

लघवी, मल, उलटी किंवा खोकल्यातून येणारे रक्त हे भयावह असू शकते आणि याचा अर्थ आहे की, तुम्हाला मुत्राशयाचा,मोठ्या आतड्याचा, पोटाचा किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर असू शकतो. नाकातून वारंवार होणारे रक्तस्त्राव आणि जखमा हे देखील रक्ताच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

६) सतत खोकला येणे किंवा घसा खवखवणे(Persistent cough or hoarseness)

जर तुम्हाला काही आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून कोरडा खोकला येत असेल आणि त्यातून रक्त येत असेल तर हे फक्त संसर्गाचे लक्षण नाही. हे लक्षण फुफ्फुस, घसा किंवा थायरॉईडच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. ट्यूमर(गाठ) यामुळे सातत्याने त्रास होत असेल आणि वायूमार्ग किंवा त्या आसपासच्या पेशींच्या भोवती परिणाम झाल्यास खोकला येतो.

७) मलामध्ये रक्त आढळणे (Blood in the stool)

जर तुम्हच्या मलाचा रंग लाल किंवा तपकिरी असेल तर ते रक्ताच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

८) गिळताना त्रास होणे किंवा अपचन(Difficulty swallowing or indigestion)

जर तुम्हाला गिळताना त्रास होत असेल किंवा छातीत जळजळ किंवा अपचन होत असेल जे बरे होत नाही तर ते घसा, अन्ननलिका किंवा पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

९) शौचाच्या सवयींमध्ये बदल(Changes in bathroom habits)

जसे सततचा जुलाब, बद्धकोष्ठता, लघवीत रक्त, किंवा लघवी करताना वेदना यांसारखी बदलती सवयी – कोलन, मूत्राशय किंवा प्रोस्टेटचा कर्करोग दर्शवू शकतात. जर ही लक्षणे कमी झाली नाही, तर हे तुमच्या पचनतंत्र किंवा लघवीच्या मार्गाशी संबंधित काही समस्या असल्याचे संकेत असू शकतात.

१०)सतत होणारी वेदना (Persistent pain)

कधीकधी, हाडे, अंडाशय, स्वादुपिंड किंवा इतर अंतर्गत अवयवांमधील कर्करोगामुळे पोट, पाठ किंवा सांध्यामध्ये होत असलेले वेदना कमी होत नाहीत. इतर वेदनांप्रमाणे ही वेदना कमी होत नाही. त्याऐवजी, ती कालांतराने आणखी वाढू शकते, याचा अर्थ असा होऊ शकतो कीस ट्यूमर वाढत आहेत किंवा शरीरावर दबाव आणत आहेत.

११) रात्रीच्या वेळी घाम, ताप किंवा सतत संसर्ग होणे (Night sweats, fevers, or frequent infections)

जर तुम्हाला ताप कमी होतत असेल, रात्री घाम येत असेल किंवा वारंवार होणारे संसर्ग ज्याचे दुसरे कोणतेही स्पष्टीकरण नाही, तर ते लिम्फोमा किंवा ल्युकेमिया सारख्या कर्करोगाचे लक्षण असू शकते, जे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात.

ही लक्षणे तर तुम्हाला कॅन्सर आहे याची खात्री देत नाही पण अत्यंत महत्त्वाची लक्षणे आहे जे दर्शवते की तुमच्या शरीरात काहीतरी बिघडले आहे. कोणताही आजाराचे निदान जितक्या लवकर होईल तितक्या आक्रमकपणे उपचार करतात आणि त्याता परिणाम दिसून येतो.

कर्करोगाचे सामान्य प्रकार(Common types of cancer)

WHOच्या अहवालानुसार, स्तनाचा कर्करोग हा जगभरातील सर्वात जास्त निदान होणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. फुफ्फुसाचा कर्करोग अजूनही सर्वात घातक आहे, विशेषतः जास्त धूम्रपान किंवा प्रदूषण असलेल्या ठिकाणी. मोठ्या आतड्याचा कर्करोगाचे प्रमाण देखील तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहे. प्रोस्टेट कर्करोग वृद्ध पुरुषांना सर्वाधिक प्रभावित करतो आणि पोटाचा कर्करोग, ज्याबद्दल कमी चर्चा झाली असली तरी, काही आशियाई देशांमध्ये अजूनही ही समस्या आहे. डब्ल्यूएचओ खरोखर ज्या गोष्टींवर भर देतो ती म्हणजे लवकर तपासणी, चांगले अन्न आणि तंबाखू सोडणे. ते म्हणतात की, या साध्या गोष्टी तुमचा धोका खरोखरच खूप कमी करू शकतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या (Consult a doctor)

जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांशी बोलणे महत्वाचे आहे. लक्षणे आणखी गंभीर होण्याची वाट पाहू नका. लक्षात ठेवा, लवकर निदान झाल्यास उपचार पर्याय आणि परिणाम सुधारू शकतात. म्हणून, वाट पाहू नका.