व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या श्रीयुत गोरेंना ७६ व्या वर्षी अॅडिनोकार्सनिोमा या प्रकारच्या फुप्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले. शस्त्रकर्म व केमोथेरपीनंतर त्यांनी आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. पथ्यपालन व नियमित औषधे यांच्या साहाय्याने श्रीयुत गोरेंनी पुढील ५ वर्षे आपल्या तिसऱ्या स्टेजमधील कॅन्सरवर नियंत्रण मिळविले. वयाच्या ८१ वर्षी श्रीयुत गोरेंचे कोणत्याही वेदना न होता निधन झाले, परंतु तेही कॅन्सरने नाही, तर वार्धक्याने!
आधुनिक वैद्यकशास्त्रात केमोथेरपी, रेडिओथेरपी व शस्त्रकर्म यांपकी त्या त्या रुग्णाच्या कॅन्सरच्या प्रकार व अवस्थेनुसार आवश्यक ती चिकित्सा केली जाते. मात्र बहुतांशी रुग्णांत फुप्फुसाच्या कॅन्सरचे निदान अतिशय पुढच्या अवस्थेत होत असल्याने व या अवस्थेत आधुनिक चिकित्सा करूनही ही व्याधी असाध्य असल्याने आयुर्वेदासारख्या बलवर्धक व प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या चिकित्सेचा रुग्णास निश्चितच लाभ होतो.
प्राणवायू, कफदोष, रक्तधातू, जठराग्नी व फुप्फुस या अवयवास बल देणाऱ्या कुमारी (कोरफड), वासा (अडुळसा), यष्टिमधु (जेष्ठीमध), गुडुची (गुळवेळ), पिप्पली (पिपळी) या वनौषधी, यष्टिमधु व वासा सिद्ध घृत, वासा कल्प, कुमारी आसव, लक्ष्मीविलास रस, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म, च्यवनप्राश अशी शमन व रसायन औषधे; िहग्वष्टक चूर्णासारखी वातदोषाचे अनुलोमन-कार्य सुरळीत करून अन्नपचन सुधारणारी औषधे फुप्फुसाच्या कॅन्सरमध्ये उपयुक्त ठरतात. तसेच रुग्णाचे बल उत्तम असल्यास तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती व वमन हे वात व कफदोषाचे कार्य सुधारणारे पंचकर्म उपक्रमही लाभदायी ठरतात. सकाळी व सायंकाळी छातीला व पाठीला औषधी तेलांनी हलक्या हाताने मालीश करून शेक दिल्यास फुप्फुसातील संचित कफाचे निस्सरण होऊन श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया सुलभ होते. याशिवाय ओवा, वेखंड, तुळशीची शुष्क पाने यांची शास्त्रोक्त पद्धतीने धुरी (धूमपान) दिल्यासही कफलिप्त श्वासमार्ग मोकळा होऊन रुग्णास आराम मिळतो. सकाळी उठल्यावर कोरफडीचा गर, आल्याचा रस व मध असे मिश्रण वैद्यांच्या सल्ल्याने योग्य मात्रेत नियमित घेतल्यास अनावश्यक कफाच्या निर्मितीस प्रतिबंध घातला जातो.
‘पथ्ये सति गदार्तस्य भेषज ग्रहणेन किम्?
पथ्ये असति गदार्तस्य भेषजग्रहणेन किम्?’
या सूत्रानुसार पथ्यकर आहार-विहाराचे पालन हा तर सर्वच आजारांमध्ये व विशेषत: पचनसंस्थेच्या व श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये चिकित्सेचा कणा आहे. चरकाचार्यानी श्वास (दमा) व हिक्का (उचकी) या श्वसनसंस्थेच्या आजारांचे अतिशय मार्मिक व चपखल चिकित्सासूत्र सांगितले आहे, जे फुप्फुसाच्या कॅन्सरसारख्या श्वसनसंस्थेच्या आजारासही लागू आहे, ते म्हणजे-
‘न्ड्डत् किंञ्चित् कफवातघ्नं उष्णं वातानुलोमनम्।
भेषजं पानं अन्न वा तद्हितं श्वासहिक्किने।।’
भावार्थ, कफ आणि वातदोषाचे शमन करणारी, उष्ण गुणाची व वाताचे अनुलोमन करणारी जी जी औषधे, घन व द्रवस्वरूपातील आहार ती सगळीच श्वसनसंस्थेच्या आजारात पथ्यकर आहेत. त्यामुळे गरम व ताजे मुगाचे कढण, साळीच्या लाह्यांचे सूप, भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, आले- लसूण- पुदिना- जिरे- धणे- मिरे- हळद- मोहोरी- कढीपत्ता असे मसाल्याचे पदार्थ, गरम पाणी, मध; तुळशीची पाने, आले व गवतीचहा यापासून तयार केलेला हर्बल टी असा आहार लाभदायी ठरतो.
फुप्फुसाच्या दमा, खोकला या विकारांप्रमाणेच फुप्फुसाच्या कॅन्सरमध्येही अतिक्रोध, चिंता ही मानसिक कारणे व्याधी निर्माण होण्यास व व्याधीचे बल वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याने मन:शांतीसाठी शवासन, संगीत श्रवण व समुपदेशन (Counselling) यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. तसेच प्राणवायूचे कार्य सुधारण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम व शक्तीचा विचार करून सूर्यनमस्कारही उपयुक्त ठरतात. थोडक्यात, आहार-विहार- मानस चिकित्सा व औषधे या सर्व उपायांनी कुडीतील प्राणाचे रक्षण करणे हेच फुप्फुसाच्या कॅन्सरचे चिकित्सा सूत्र आहे.  

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका