मानवी शरीराचे रोगजंतूंपासून संरक्षण करणारे एक प्रथिनच त्वचेच्या कर्करोगाच्या वाढीस उत्तेजन देते असे संशोधनातून दिसून आले आहे.
इंपिरियल कॉलेज लंडन या ब्रिटनमधील संस्थेत काम करणाऱ्या संशोधकांच्या मते आयजीइ प्रतिपिंड हे नेहमीच अॅ लर्जीकारक शारीरिक क्रियांशी संबंधित असते. ते आरोग्यदायी त्वचेत असते व पर्यावरणातील घातक घटक व रोगजंतूंपासून संरक्षण करते. पण त्वचेची आग करणाऱ्या रसायनांशी संबंध आल्याने कालांतराने हे प्रथिन घातक रूप धारण करते. घातक आग व वेदना यातून अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. त्यात पेशींची वाढ अनियंत्रित करणारी उत्परिवर्तने होतात असे मत इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनचे मार्क हेस यांनी म्हटले आहे. आयजीई प्रथिनाची यातील नेमकी भूमिका आधी स्पष्ट झालेली नव्हती.

आताच्या अभ्यासात यातील जैविक क्रिया उलगडली असून जेव्हा त्वचेची आग करणारी रसायने स्पर्श करतात तेव्हा या प्रथिनाची निर्मिती वाढते. त्यामुळे बॅ्रसोफिल्सया प्रतिकारशक्ती पेशी त्वचेकडे आकर्षित होतात. त्यामुळे प्रतिसाद म्हणून त्वचेचा थर जाड होतो. पण ही प्रतिक्रिया तात्पुरतीच ठरली नाही तर तो सतत जाड राहून कर्करोगाच्या गाठी होतात.

आयजीई जर जास्त क्रियाशील झाले तर त्यातून कर्करोगकारक उत्परिवर्तने होतात. आयजीईमुळे कर्करोगकारक रसायनांच्या माध्यमातून होणारी डीएनएची हानी रोखली जाते असे आधी सांगण्यात येत होते. त्यामुळे पर्यावरणातील घटक व प्रतिपिंड यांना शरीरातील या प्रथिनाकडून मिळणारा प्रतिसाद यावर त्याचा परिणाम चांगला होणार की वाईट हे अवलंबून असते असे इंपिरियल कॉलेज लंडन येथील जेसिका स्ट्रिड यांनी म्हटले आहे.