Fruits To Eat During Cancer: कर्करोगाच्या उपचार आणि रिकवरी दरम्यान योग्य आहार निवडणे आवश्यक आहे. याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास रोगाशी लढण्यास मदत होते. त्याचबरोबर आहारात निष्काळजी राहिल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये अजिबात निष्काळजीपणा बाळगून चालत नाही. या आजाराशी लढण्यासाठी नियमित आहार आणि औषध घेणे गरजेचे आहे. याशिवाय आहारात काही निवडक फळांचा समावेश करणे देखील आवश्यक आहे. तर जाणून घ्या काही निवडक फळे ज्यांचे सेवन केल्याने निरोगी राहण्यास मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केळी खा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कर्करोगाच्या उपचारादरम्यान, रुग्णाला जुलाबाची तक्रार असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा कर्करोगाच्या उपचारांचा एक सामान्य दुष्परिणाम आहे. केळी अतिसारावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरते. यासाठी केळीचा आहारात नक्कीच समावेश करा. केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, मॅंगनीज यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. यासाठी केळ्याला सुपरफूड म्हणतात.

( हे ही वाचा: Monkeypox: मंकीपॉक्स अभ्यासात आढळून आली तीन नवीन गंभीर लक्षणे; वेळीच जाणून घ्या)

बेरी खा

बेरीमध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज आणि अँटीऑक्सिडंट्ससह इतर अनेक गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाने त्रस्त रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यासाठी कॅन्सरच्या रुग्णांनी बेरीचे सेवन अवश्य करावे.

पाहा व्हिडीओ –

डाळिंब खा

डाळिंब हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे स्मरणशक्ती देखील मजबूत होते. त्याच वेळी, मेंदूची क्रिया वाढते. यासाठी डाळिंबाचा आहारात समावेश करा. रक्तवाढीस देखील डाळिंब भरपूर फायदेशीर आहे.

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दिवसातून किती वेळ चालणे आवश्यक आहे? जाणून घ्या)

संत्री खा

संत्री आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच, संत्रा कर्करोगाच्या पेशी वाढण्यास आणि पसरण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी कर्करोगाच्या रुग्णांनी बरे होण्यासाठी संत्र्याचा रस जरूर प्यावा. याशिवाय द्राक्षे, लिंबू यांचेही सेवन करता येते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer patients should include these fruits in their diet gps
First published on: 28-07-2022 at 17:34 IST