Head and neck cancer: आजच्या काळात लोक अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्यासारखे वागतात. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, शरीरात दिसणारे काही बदल हे एखाद्या गंभीर आजाराची धोक्याची सूचना असू शकतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य माहिती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. या लेखातून आपण दीर्घकाळ टिकणारा घशाचा त्रास (किंवा घसा दुखणे) अशाच एका आरोग्य समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. जरी हा एक सामान्य आजार वाटत असला तरी तज्ज्ञांच्या मते, जर हा त्रास बराच काळ टिकून राहिला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही प्रकरणांमध्ये दीर्घकाळ टिकणारा घशाचा त्रास हे डोके आणि मानेच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

घशातील दुखण्याकडे किती काळापर्यंत दुर्लक्ष करू नये?

हवामानातील बदलांमुळे किंवा अनेकदा फ्लू अथवा विषाणूजन्य संसर्गामुळे घसा दुखू शकतो; मात्र ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास ती किरकोळ बाब मानू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. त्याव्यतिरिक्त आवाज बसणे किंवा आवाजात खोलपणा येणे, तोंडाच्या आत बराच काळ न भरणारी जखम, अन्न गिळताना होणारी वेदना किंवा अडचण, तसेच मानेवर गाठ किंवा सूज येणे यांसारख्या लक्षणांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. ही सर्व लक्षणे डोके आणि मानेच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतात. अनेक तज्ज्ञांच्या मते, अनेक रुग्ण रुग्णालयात तेव्हाच पोहोचतात जेव्हा कर्करोग बऱ्यापैकी बळावलेला असतो. कारण- सुरुवातीच्या लक्षणांकडे ते अनेकदा दुर्लक्ष करतात आणि त्यांना सामान्य समस्या समजून, त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

डोके आणि मानेच्या कर्करोगाची कारणे काय आहेत?

उपलब्ध माहितीनुसार, जेव्हा या भागातील पेशींमध्ये असामान्य बदल होतात आणि त्या वेगाने व अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा डोके आणि मानेचा कर्करोग उद्भवतो. भारतात तंबाखू आणि मद्याचे सेवन ही डोके आणि मानेच्या कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत.

त्याशिवाय तंबाखू आणि मद्यपानापासून दूर राहणे ही या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वांत महत्त्वाची पायरी आहे; त्यासोबतच दररोज तोंडाची स्वच्छता राखा, स्वच्छ व सकस आहार घ्या ज्यात ताज्या फळांचा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असलेला स्वच्छ व सकस आहार घ्या आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. चांगल्या सवयी तुम्हाला आरोग्याशी संबंधित गंभीर धोक्यांपासून सुरक्षित ठेवू शकतात.

तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकता?

घशातील सततची खवखव किंवा दुखणे हे कर्करोगामुळेच असते, असे आम्ही म्हणत नाही. तरीही त्याचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि परिस्थिती गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. आता या आजारापासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकता ते पाहूया. जर डोके आणि मानेचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यावरच आढळला, तर यशस्वी उपचारांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच शरीरातील कोणत्याही असामान्य बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर घशातील खवखव, आवाजात झालेला बदल किंवा तोंडातील जखम दीर्घकाळपर्यंत बरी होत नसेल तर तुम्ही विलंब न करता कान-नाक-घसा तज्ज्ञांचा (ENT specialist) सल्ला घ्यावा. त्याव्यतिरिक्त तंबाखू आणि मद्यपानापासून दूर राहणे हा सर्वांत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.