scorecardresearch

रात्रीची झोप उडालीय?, ‘या’ ३ गोष्टींमुळे तुम्हाला येईल शांत झोप

रात्री झोप येत नसेल, तर आपल्यात नैराश्य, चिंता या समस्या वेगाने वाढू लागतात.

रात्रीची झोप उडालीय?, ‘या’ ३ गोष्टींमुळे तुम्हाला येईल शांत झोप
रात्रीची झोप येण्यासाठी घरी करता येणारे उपाय

चुकीची जीवनशैली, ताणतणाव इत्यादी गोष्टींमुळे बरेच लोक निद्रानाशच्या समस्येने झगडत आहेत. अशा लोकांना रात्री झोप येत नाही. या लोकांना दिवसभर थकवा जाणवतो आणि ते मानसिक ताणतणावात असतात. बर्‍याच लोकांमध्ये ही समस्या फार आधीपासून असते. अशा परिस्थितीत नैराश्य, चिंता या समस्या त्यांच्यात वेगाने वाढू लागतात. तुम्हीदेखील अशा प्रकारच्या समस्येचा सामना करत असाल, तर या समस्येवर मात करण्यासाठी खाली दिलेल्या घरगुती उपचारांचे अनुसरण करू शकता.

ध्‍यान करा

शांत आणि रिकाम्या ठिकाणी बसून दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद करा आणि श्वास घ्या. आपण ही प्रक्रिया ५ मिनिटे ते २० मिनिटे करू शकता. असे दररोज केल्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि आपले आपल्या भावनांवर नियंत्रण राहील. त्यामुळे तुमची झोपही चांगली होईल.

मंत्र आणि जप

मनाला शांत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. जर रात्री झोप येत नसेल तर काही मंत्रांचा जप करा. आपल्याला कोणताही मंत्र माहीत नसेल, तर आपण ओमचा जप करू शकता.

हेही वाचा – ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये डोळ्यांना होतोय त्रास..? ‘हे’ तीन उपाय करून पाहा

योगा करा

चांगल्या झोपेसाठी, दररोज २० मिनिटे योगाभ्यास करा. हे केवळ आपल्या स्नायूंना आराम देत नाही, तर आपले मनही शांत होते. आपण योग तज्ञाकडून वेगवेगळ्या आसनांविषयी माहिती घेतल्यास चांगले होईल. काही दिवसातच तुम्हाला बरे वाटेल आणि रात्री चांगली झोप घेता येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या