Cardamom benefit: वेलची हा भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक महत्वाचा मसाला आहे. गोड, चमकदार, चवदार आणि झणझणीत खाद्यपदार्थांमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेष म्हणजे वेलचीचा चहा तर खूप जास्त प्रसिध्द आणि हेल्दी आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमध्ये हे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या आणि संक्रमण दूर करण्याचे काम करते. वेलचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून देखील केला जातो. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही वेलची खूप जास्त फायदेशी मानली जाते. मात्र तुम्हाला माहितीये का हिवाळ्यात तर तुम्ही वेलचीचे सेवन केलेच पाहिजे. चला जाणून घेऊयात थंडीत वेलची खाण्याचे फायदे.

वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे स्नायूंना मजबूत करण्याचे काम करतात.वेलची खाल्ल्याने हृदयही निरोगी राहते. झोपेच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. वेलची खाल्ल्याने तोंडातील बॅक्टेरिया निघून जातात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, त्याचे सेवन प्रमाणातच असावे. अतिसेवनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे पोटही खराब होऊ शकते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

वेलचीमुळे घसादुखीसह शरीराचे हे आजार बरे होतात

जेवणानंतर वेलची खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे झोपेच्या समस्याही सुधारतात. त्यामुळे रात्री वेलची खाऊ शकता. वेलचीमुळे घशाची खवखवही बरी होते.

वेलचीचे उपयोग आणि फायदे

जर आपण वेलची खाण्याच्या फायद्यांबद्दल बोललो तर वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश होतो. वेलची दुधात उकळून त्यात मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. त्यामुळे तुमचे शरीर आतून मजबूत होते. वेलचीच्या नियमित सेवनाने कॅन्सरसारख्या घातक आजारांवर मात करता येते. याव्यतिरिक्त, त्यातील दाहक-विरोधी घटक तोंडी आणि त्वचेच्या कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.

वेलचीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. जर तुम्ही गॅस आणि अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर जेवणानंतर तुम्ही नेहमी वेलचीचे सेवन करू शकता. वेलचीमध्ये उष्ण प्रकृती असते, जी दम्यामध्ये प्रभावी ठरते.

हेही वाचा >> आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या

वेलचीमध्ये आढळणारे घटक बघितले तर त्यात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस आढळतात. जे निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे अशा स्थितीत पुरुषांनी याचे सेवन नक्की करावे.

Story img Loader