cardiac arrests are more likely to occur early in the morning know reason and precaution | Loksatta

पहाटेच्या वेळीच हृदयविकाराचा झटका जास्त करून का येतो? ‘या’ लोकांना वेळीच व्हावे लागेल सावध

पहाटेच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त का आहे? जाणून घ्या

पहाटेच्या वेळीच हृदयविकाराचा झटका जास्त करून का येतो? ‘या’ लोकांना वेळीच व्हावे लागेल सावध
फोटो: संग्रहित फोटो

ह्रदयविकाराची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. हल्ली ह्रदयविकाराचा झटका आणि त्यासंबंधित त्रासही तरुणांना होत आहे. सकाळच्या वेळी कार्डिअॅक अरेस्टचा धोका जास्त असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांना सकाळच्या वेळी झटका येण्याचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यामागची कारणे. हृदयविकाराचा धोका कोणत्या मार्गांनी कमी केला जाऊ शकतो हे देखील जाणून घ्या.

गेल्या काही वर्षांत हृदयविकाराची समस्या खूप सामान्य झाली आहे. कधीही कोणालाही या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तसंच, तज्ञांचे मत आहे की बहुतेक लोकांना दिवसाच्या पहाटे हृदयविकाराच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की, हृदयविकाराचा झटका सकाळी का येतो.

( हे ही वाचा: Viral Infection: बदलत्या ऋतूत वाढतोय व्हायरल इन्फेक्शनचा धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावधान)

यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीरातून काही हार्मोन्स बाहेर पडल्यामुळे असे होते. सकाळी चारच्या सुमारास, आपले शरीर सायटोकिनिन नावाचे हार्मोन सोडते ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार आपल्या शरीराचे अंतर्गत घड्याळ यासाठी जबाबदार असते. एका तज्ज्ञाच्या मते, आपल्या शरीरात एक जैविक घड्याळ असते जे आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करते.

तज्ञांनी सांगितले की लोक दिवसा खूप सक्रिय असतात. त्याच वेळी, लोक रात्री खूप थकलेले असतात आणि त्यांना खूप झोपेची आवश्यकता असते. या जैविक घड्याळामुळे सकाळच्या पहिल्या काही तासांत आपला रक्तदाब आणि हृदय गती वाढते. सर्कॅडियन रिदम प्रतिसादात हृदय गती आणि रक्तदाब वाढल्याने सकाळच्या वेळी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला खूप त्रास होतो. सर्कॅडियन रिदम शरीराच्या आत २४ तासांच्या घड्याळाप्रमाणे आहे जे वातावरण आणि दिवे बदलत असताना तुमच्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या वेळेचा मागोवा ठेवते.

( हे ही वाचा: Blood Sugar: रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास पायात दिसतात ‘या’ गंभीर समस्या; वेळीच ओळखा नाहीतर…!)

सकाळच्या वेळी येणारे झटके यासाठी सर्कॅडियन रिदम जबाबदार मानला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील प्लेटलेट्स चिकट असतात आणि एड्रेनालाईन ग्रंथींमधून वाढलेल्या एड्रेनालाईनच्या स्त्रावमुळे कोरोनरी धमन्यांमध्ये प्लेक तुटतो तेव्हा बहुतेक हृदयविकाराचा झटका सकाळी ४ ते १० या दरम्यान होतो.

सर्कॅडियन सिस्टीम सकाळी जास्त प्रमाणात PAI-1 पेशी सोडते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या फुटण्यापासून बचाव होतो. रक्तातील PAI-1 पेशींची संख्या जितकी जास्त असेल तितकी रक्तामध्ये रक्ताची गुठळी तयार होण्याची शक्यता जास्त असते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या आणखी एका संशोधनात असे आढळून आले की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असलेल्या रुग्णांच्या रक्तातील संरक्षणात्मक रेणूंची पातळी सकाळी लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे यावेळी रक्ताच्या गुठळ्या आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

( हे ही वाचा: लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्येही आढळून आला कॅन्सर; शास्त्रज्ञांनी ‘या’ चाचणीद्वारे ओळखले, वेळीच जाणून घ्या)

कोणते घटक हृदयविकाराचा धोका वाढवतात?

मधुमेह, उच्चरक्तदाब, नियमित धूम्रपान यांमुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या तज्ज्ञाने असेही सांगितले की, आजच्या काळात तरुण पिढीला त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीलाच हृदयविकाराचा सामना करावा लागतो. यामागे अनेक कारणे आहेत, जसे की चुकीची जीवनशैली, खराब झोप आणि जागरण चक्र, ताणतणावाचे प्रमाण वाढणे, अति प्रमाणात मद्यपान करणे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर ७ ते ८ तास पुरेशी झोप घेणे, तणावमुक्त जीवन जगणे आणि सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-09-2022 at 10:29 IST
Next Story
Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक