Cashew Harmful Effects: काजूला आपण ‘पोषक तत्त्वांचा खजिना’ म्हणतो. गोड पदार्थ, मिठाई, काजू कुठेही टाकला तरी चव दुप्पट होते. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळतं. अनेक डॉक्टर आणि आयुर्वेदतज्ज्ञ काजूचा माफक प्रमाणातील वापर आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगतात.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, नियमित काजू खाणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार, कर्करोग आणि श्वसनाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी असतो. नट्समधील प्रथिने, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स शरीराला संरक्षण देतात.

परंतु, याच काजूबद्दल एक धक्कादायक सत्य पुढे आलं आहे. काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, काजू ‘३ विशिष्ट आजारांमध्ये’ विषासारखं काम करतो. चुकून जास्त प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी काजू खाल्ल्यास तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला पाहूया काजू कोणत्या आजारांमध्ये धोकादायक आहे आणि किती मात्रेमध्ये खाल्ल्यास तो सुरक्षित ठरतो.

या तीन आजारांत काजूचे सेवन ठरू शकते घातक!

१. उच्च रक्तदाब (High BP) – काजू म्हणजे ‘हृदयासाठी धोका’

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट केअरचे संस्थापक डॉ. बिमल छाजेर यांनी त्यांच्या एका व्हिडीओत सांगितलं, १०० ग्रॅम काजूमध्ये ८-१० चमचे तेल असतं. काही लोक तर हे काजू तळूनच खातात, जे हृदयासाठी अति घातक आहे. काजूमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. रक्तदाब झपाट्यानं वाढण्याची शक्यता असते. हृदयविकार असणाऱ्यांसाठी काजू म्हणजे ‘शुद्ध विषासारखा’, त्यामुळे उच्च रक्तदाब किंवा हार्टच्या रुग्णांनी काजूपासून दूर राहणंच उत्तम.

२. अति अॅसिडिटी आणि गॅस – रिकाम्या पोटी खाल्ल्यास धोका

डॉक्टरांच्या मते, काजूमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने रिकाम्या पोटी जास्त काजू खाल्ल्यास शरीरातील फायबर अचानक वाढतं आणि त्याचा परिणाम पोटात जळजळ, तीव्र अॅसिडिटी, गॅसची समस्या, पोट फुगणे; अनेकांना याच कारणामुळे पचनबदल हाताळता येत नाही.

३. किडनीचे आजार – पोटॅशियम वाढून स्थिती गंभीर

डॉ. छाजेर पुढे सांगतात, किडनीच्या रुग्णांसाठी काजू हा टाळावयाचा पदार्थ आहे. कारण काजूमधील पोटॅशियमचे प्रमाण किडनीवर अतिरिक्त भार टाकते. शरीरातील पोटॅशियम पातळी वाढून स्थिती गंभीर होऊ शकते. ज्यांना किडनीशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी काजूचे सेवन टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे.

काजूमुळे वाढू शकतं वजन

डॉ. छाजेर यांच्या मते, काजूमध्ये फॅट्स जास्त असल्याने ते वजन वाढवते. लठ्ठपणाला आमंत्रण देते, म्हणून वजन वाढल्यास त्याचे थेट दुष्परिणाम हृदयावरही होऊ शकतात.

मग किती काजू खाणं सुरक्षित?

एक निरोगी व्यक्ती:

दिवसाला ४-५ काजूपेक्षा जास्त खाऊ नये. ज्यांना हृदय, किडनी किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांनी मात्र काजू खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे.