scorecardresearch

हनुवटीकर केस का येतात? ‘ही’ असू शकतात कारणे

हनुवटीवर केस का येतात, हा प्रश्न तुम्हाला पडत असेलच. तर यामागे काही कारणे आहेत. ही कारणे जाणून घेतल्यास त्यावर तोडगा देखील निघू शकतो.

हनुवटीकर केस का येतात? ‘ही’ असू शकतात कारणे
प्रतिकात्मक छायाचित्र (Photo : Freepik)

महिलांच्या हनुवटीर आलेले केस सुंदरता बिघडवू शकतात. हनुवटीवर केस का येतात, हा प्रश्न तुम्हाला पडतच असेल. तर यामागे काही कारणे आहेत. ही कारणे जाणून घेतल्यास त्यावर तोडगा देखील निघू शकतो.

ही कारणे असू शकतात

१) पॉलिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे महिलांना हनुवटीवर केस येऊ शकतात. हा हार्मोन ओवरी डिसॉर्डर आहे, यामुळे महिलांच्या शरीरात एंड्रोजन वाढते आणि त्यामुळे हनुवटीवर केस येऊ शकतात.

२) ओवेरियन ट्युमरमुळे देखील हनुवटीवर केस येऊ शकतात. एड्रिनल हार्मोन वाढल्याने ओवेरियन ट्युमर होऊ शकते. याच्या लक्षणांमध्ये हनुवटीवरील केसांचाही समावेश आहे.

3) काही महिलांमध्ये ही समस्या अनुवांशिक असू शकते. घरी आई किंवा जवळच्या नातेवाईकाला ही समस्या असल्यास तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

हनुवटीवर केस आल्यास अस्वस्थ होऊ नका. योग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या आणि त्यानंतर उपचार करा. वरील कारणांवरून ही समस्या हार्मोनमुळे येत असल्याचे निदर्शनास येते. मात्र, चिंता न करता योग्य मार्गाने या समस्येचे निराकरण होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या