चक्कर येणं किंवा डोळ्यावर अंधारी येणं ही अनेकजण सामान्य समस्या मानतात. अनेकजण ही समस्या काहीवेळात ठीक होईल समजून सहन करता, बरं वाटल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. काही जण हे अशक्तपणा किंवा अपूर्ण झोपेमुळे होत असल्याचे म्हणतात. पण जर हे दररोज किंवा वारंवार होत असेल, तर दुर्लक्ष करु नका. यामागे नेमकी या कारणं आहेत समजून घ्या.
सकाळी उठल्यानंतर चक्कर येण्यामागे नेमकी कारणं काय? (5 Reasons You’re Waking Up Dizzy)
१) रक्तदाब कमी होणे
सर्वात सामान्य कारण म्हणजे कमी रक्तदाब (लो ब्लड प्रेशर).जेव्हा आपण अचानक झोपेतून उठतो तेव्हा आपला रक्तदाब काही काळासाठी कमी होऊ शकतो. यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि चक्कर येते.याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात.जर तुम्हाला दररोज सकाळी हे जाणवत असेल तर तुमचा रक्तदाब तपासणे महत्वाचे आहे.
२) शरीरात पाण्याची कमतरता
दुसरे एक प्रमुख कारण म्हणजे डिहायड्रेशन. आपण रात्री पाणी पित नाही, त्यामुळे आपल्याला थोडेसे डिहायड्रेटेड होते. जर आपण दिवसा कमी पाणी प्यायलो तर सकाळी चक्कर येण्याची शक्यता वाढते.म्हणून उठताच एक ग्लास साधे पाणी प्या.
३) अशक्तपणा
अशक्तपणा देखील एक कारण असू शकते. जेव्हा हिमोग्लोबिनची पातळी कमी असते तेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे चक्कर येणे, थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. ही समस्या विशेषतः महिला आणि वृद्धांमध्ये सामान्य आहे.
४) रक्तात साखरेची कमी
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असणे हे देखील एक कारण असू शकते. जर तुम्ही हलके जेवण केले असेल किंवा मधुमेहाची औषधे घेत असाल तर सकाळी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. यामुळे चिंता,घाम येणे आणि चक्कर येणे होऊ शकते.
५) व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता,कानाची समस्या, जास्त ताण किंवा झोपेचा अभाव ही देखील कारणे असू शकतात. जर चक्कर येणे आणि तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, बोलण्यात अडचण येणे, छातीत दुखणे किंवा हातपाय सुन्न होणे यासारखी लक्षण दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळी उठल्यानंतर चक्कर येऊ नये म्हणून काय करावे?
सकाळी पटक अंथरुणातून उठू उभे राहू नका, प्रथम कुशीवर व्हा, नंतर हळूहळू बसा. काही सेकंद थांबा, नंतर उभे राहा. दररोज भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि नियमित तपासणी करा.जर ही समस्या कायम राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे.
