‘ह्या’ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी मिठाई बनवून साजरी करा गोकुळअष्टमी!

गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. श्रीकृष्ण तर त्यांच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला आणि भगवतगीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत आहे.

श्री कृष्णाच्या जयंती निमित्त बनवा हेल्दि मिठाई.

गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. श्रीकृष्ण तर त्यांच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला आणि भगवतगीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत आहे. त्या श्रीकृष्णासाठी हा सण साजरा केला जातो. आजच्या या शुभ दिवशी प्रत्येकाच्या घरात काहींना काही गोड पदार्थ तयार होतच असतात. श्रीकृष्णाचा जन्म दिवस साजरा केल्यानंतर गोकुळाष्टमी सण प्रत्येक ठिकाणी साजरा करतात. अनेकजण मिठाई, खीर असे गोड पदार्थ बनवत असतात. आपल्या भारत देशात प्रत्येक सण साजरे केले जातात. हे सण साजरे करण्यासाठी गोड पदार्थ हा केला जातो. तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गोकुळअष्टमी करिता शरीराला फायदे पुरवणार्‍या या पदार्थांची मिठाई बनवा. चला तर मग जाणून घेऊयात.

नारळाचे लाडू

सर्व मिठाई मध्ये सगळ्यात सोपी आणि झटपट मिठाई म्हणजे नारळाचे लाडू. अगदी १५ मिनिटात तुम्ही नारळाचे लाडू बनवू शकतात. नारळ हा फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. तुम्ही नारळाचे लाडू बनवता तेव्हा साखर ऐवजी व्हाइट शुगर आणि दुधा ऐवजी कंडेन्स मिल्क (condensed milk) वापरुन तुमची ही स्वीट्स डिश हेल्दि बनवू शकतात.

मखाना खीर

मखाना म्हणजे फॉक्सनट म्हणून ओळखलं जाते. मखाना ही फायबर युक्त असून वजन कमी करण्यास देखील मदत करतात. याच बरोबर हृदयाचे आरोग्य नीट ठेवण्यास मदत करतात. मखाना खीर बनवा आणि गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात आपल्या परिवारासोबत साजरी करा.

दुधीभोपळ्याची बर्फी

दुधीभोपळ्याचे आपल्या शरीरला अनेक फायदे होत असतात. वजन कमी करण्यास तसेच आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करते व पाचनक्रिया सुधारते. असे फायदे होत असतात. या करिता तुम्ही दुधीभोपळ्याची स्वादिष्ट बर्फी बनवा.

अॅपल रबडी

सफरचंदात फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असे स्त्रोत आहेत. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्या व्यतिरिक्त ते वजन आणि कॅलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. या करिता तुम्ही हेल्दि स्वीट डिश बनवा तसेच याबरोबर डिशमध्ये अँटिऑक्सिडंट्स करिता तुम्ही यात ड्रायफ्रूट घाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Celebrate gokul ashtami by making this delicious and healthy dessert scsm