१-७ ऑगस्ट या काळात दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह अनेक देशांमध्ये साजरा होतो. याची मूळ संकल्पना व जागतिक समन्वय वाबा (WABA:World Alliance of Breastfeeding Action) या संस्थेची आहे. १९९२ मध्ये पहिला जागतिक स्तनपान सप्ताह साजरा झाला. प्रत्येक वर्षी नवीन घोषवाक्यासह हा दिवस साजरा होतो. या वर्षीचे घोषवाक्य ‘स्तनपानाचे संरक्षण: ही सामूहिक बांधिलकी’ हे आहे. नवीन मातांना स्तनपानासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. बाळाच्या जन्माच्या एका तासात बाळाला पहिले स्तनपान मिळावे याची खात्री करणे केवळ आईचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. स्तनपान हा पर्याय नसून संकल्प आहे.

स्तनपानाचे संरक्षण का करायचे?

यशस्वी शिशुपोषणामुळे बाळाचे, कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुधारण्यास मोठा हातभार लागतो.अत्युच्च बौधिक, शारीरिक आणि मानसिक क्षमा गाठण्यासाठी पहिल्या हजार दिवसातील (गर्भावस्था ते दुसऱ्या वाढदिवसापर्यंत)  पोषण गरजेचे आहे कारण या काळात बाळाची वजन वाढ जरी फक्त २०% झालेली असते तरी मेंदूची वाढ ८०% व उंचीची वाढ ५०% झालेली असते.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

यशस्वी शिशुपोषण म्हणजे काय?

  • प्रसूतीनंतर लगेचच (साधारण पाच मिनिटात) आईने बाळाला घेऊन प्रथम स्पर्श द्यावा ज्यामुळे बाळ १ तासात स्तनपानास सुरुवात करेल.
  • जन्मापासून सहा महिने पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे निव्वळ स्तनपान देणे .
  • सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाच्या वाढीला योग्य, पुरेसा आणि स्वच्छतापूर्वक बनविलेला, घरगुती पूरक आहार देणे व कमीत कमी दुसऱ्या वाढदिवसापर्यंत स्तनपान सुरु ठेवणे.
  • स्तनपान करताना व जेवू घालताना बाळाशी संवाद साधावा. यामुळे बाळास बौद्धिक व मनसिक चालना मिळेल.

प्रसूतीदरम्यान किंवा नंतर आईला कोविड झाला असेल तर?

प्रसूतीदरम्यान किंवा नंतर आईला कोविड झाला असेल किंवा तसा संशय असेल तर स्तनपानाच्या शिफारसी तिच्यासाठी बदलत नाहीत. सर्वसाधारण मातेप्रमाणेच ती कोविड नियमांचे पालन करून स्तनपान करू शकते. स्तनपान करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुणे, तोंडावर मास्क लावणे या गोष्टी पाळाव्यात. कोविडबाधीत माता जर खूप आजारी असेल तर तिचे दूध काढून इतर व्यक्ती बाळाला वाटी चमच्याने पाजू शकतात. [पण बाटलीचा वापर करू नये.

आईला कोविड नसेल तर?

घरात स्तनपान करताना मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. बाहेरील माणसांना आवश्यकतेशिवाय घरी बोलावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गरोदरपणात ४थ्या महिन्यापासून व सर्व स्तनदा माता कोविड लस घेऊ शकतात.

या क्षेत्रातील डॉक्टर आणि जाणकार  सौ. स्वाती टेमकर, लॅक्टेशन कंंसल्टंंट बीपीएनआय महाराष्ट्र आणि  डॉ प्रशांत गांगल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे.

(त्याचप्रमाणे याविषयी प्रथम आपण आपले फॅमेली डॉक्टर व याविषयातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा. )