आजच्या काळात व्यस्त जीवनशैली, झोपेचा अभाव, मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त काम करणे आणि बराच वेळ टीव्ही पाहणे यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे चेहऱ्याचं सौंदर्य खराब करता. यामुळे आपण आजारी असल्यासारखे दिसतो. जर डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांवर वेळीच उपचार केला नाही तर आपल्या चेहऱ्यावरील चमक आपण गमावून बसतो. म्हणूनच बॉलिवूड सेलिब्रिटींचे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचं आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या त्यांच्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी डार्क सर्कल या समस्येयवर मार्गदर्शन केलंय.

दररोज आले आणि तुळशीचा चहा प्या: ऋजुता दिवेकर यांच्या मते, डोळ्यांखाली असलेल्या काळ्या वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी आले, तुळस, मध आणि केशरचा चहा पेणं हा एक उत्तम उपाय आहे. या चहाचे नियमित सेवन केल्याने केवळ डोळ्यांखालची काळी वर्तुळेच नाही तर डोळ्यांचा थकवा सुद्धा दूर होतो.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

शेंगदाणे आणि गूळ: सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात की, शेंगदाणे आणि गूळ नारळाच्या तेलात मिसळून खाल्ल्याने डार्क सर्कलपासून सुटका मिळते. यासाठी शेंगदाणे, गूळ आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून खा. संध्याकाळी नाश्त्याच्यावेळी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान खाऊ शकता.

अर्धा तास विश्रांती घ्या: ऋजुता दिवेकर सांगतात की, दिवसातून दुपारी अर्धा तास झोपूनही डार्क सर्कलची समस्या दूर होते. म्हणून, दुपारी किमान अर्धा तास तरी विश्रांती घ्या आणि रात्री ११ वाजण्याच्या आधी झोपण्याची सवय लावा.

बेसन आणि ताजे दूध: ज्या व्यक्तींच्या डोळ्याखाली काळी गडद वर्तुळ आहेत अशा व्यक्तींना साबण आणि फेस वॉश टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी घरगुती क्लींजर वापरण्यात यावं, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात. आपण ताज्या दुधात बेसनमध्ये मिक्स करूने ते मिश्रण साबण आणि फेस वॉशऐवजी वापरू शकतो. यामुळे डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.