scorecardresearch

Diabetes : आता स्वस्तात मिळणार मधुमेहावरील ‘ही’ औषध, किंमत केवळ ६० रुपये, कुठे मिळणार जाणून घ्या..

केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने सीटाग्लिप्टीन ही मधुमेहाची औषध ६० रुपयांमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहे.

Diabetes : आता स्वस्तात मिळणार मधुमेहावरील ‘ही’ औषध, किंमत केवळ ६० रुपये, कुठे मिळणार जाणून घ्या..
प्रतिकात्मक छायाचित्र (Image: Freepik)

देशात मधुमेह हे प्रमुख आजारांपैकी एक आहे. प्रत्येक १० पैकी ४ लोकांना मधुमेहाची समस्या आहे. भारतात हा आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यात टाइप – १ आणि टाइप – २ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने सीटाग्लिप्टीन ही मधुमेहावरील औषध ६० रुपयांमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहे.

ही आहे किंमत

सीटाग्लिप्टीन ही मधुमेहावरील औषध आहे. या औषधीच्या १० गोळ्या आता ६० रुपायांमध्ये जन औषधी केंद्रांमध्ये मिळणार आहेत. भारतीय औषध आणि वैद्यकीय उपकरणे ब्युरो (PMBI) ने सीताग्लिप्टीन आणि तिच्या नवीन आवृत्त्या जन औषधी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती रसायन आणि खते मंत्रालयाने एका निवदेनातून दिली.

(उवांशिवाय ‘या’ ५ कारणांमुळे दखील डोक्यात खाज येऊ शकते, करा हे उपाय)

ब्रँडेड औषधींपेक्षा इतक्या रुपयांनी कमी

सीटाग्लिप्टीन फॉस्फेटच्या ५० मिलीग्रामच्या १० गोळ्यांच्या पाकिटाची कमाल किरकोळ किंमत ६० रुपये आहे, तर १०० मिलीग्राम गोळ्यांच्या पाकिटाची किंमत १०० रुपये इतकी आहे. या औषधीच्या किंमती ब्रँडेड औषधींपेक्षा ६० ते ७० टक्के कमी आहेत. ब्रँडेड औषधींची किंमत १६० रुपयांपासून ते २५८ रुपयांपर्यंत आहे, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

काय आहे मधुमेह?

मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाणा नियंत्रणात राहात नाही. आपल्या शरीरात स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी असते. ही ग्रंथी इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार करते. इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्तामध्ये तयार होणारे ग्लुकोज किंवा साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते. परंतु, शारीरिक बदलांमुळे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. कालांतराने व्यक्ती मधुमेहाची बळी ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central government launches sitagliptin medicine for diabetes patient for rs 60 ssb

ताज्या बातम्या