कुशल रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांच्या धोरणांनी समाजाला नेहमीच मार्गदर्शन केलं आहे. कौटिल्य या नावाने प्रसिद्ध असलेले आचार्य चाणक्य यांना जवळपास सर्वच विषयांची सखोल माहिती होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे नीतिशास्त्र हे एक अतिशय उपयुक्त पुस्तक मानलं जातं, कारण त्यात जीवनाशी संबंधित सर्व पैलूंबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचार्य चाणक्यांनी धर्म, शिक्षण, पती-पत्नी, संपत्ती आणि करिअर या सर्व विषयांबद्दल आपल्या नीतिशास्त्रात सांगितलं आहे. चाणक्यांच्या मते, धावपळीच्या जीवनात जर एखाद्या व्यक्तीला आपल्या करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर त्याने या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी-

प्रामाणिकपणा आणि शिस्त: आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याने नेहमी आपल्या कामात प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असलं पाहिजे. चाणक्यांच्या मते, जर तुमच्या जीवनात शिस्त नसेल तर तुम्हाला यश मिळू शकत नाही. म्हणूनच, नेहमी लक्षात ठेवा की यश मिळविण्यासाठी शिस्त असणं खूप महत्वाचं आहे.

चांगले वर्तन: आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याने आपलं वर्तन नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे. चाणक्यजी मानतात की, जे लोक अनेक गोष्टींनी समृद्ध असतात, ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. म्हणूनच माणसाने नेहमी गोड बोललं पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नाआधी तुमच्या जोडीदाराबद्दल या पाच गोष्टी आवर्जून जाणून घ्या, आयुष्य सुखी होईल

जोखीम घेण्याचे धाडस: व्यक्तीने त्याच्या/तिच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी व्यवसायात जोखीम घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे. चाणक्यजी मानतात की, जो माणूस जोखीम पत्करण्यास नेहमी तयार असतो, तो भविष्यात लवकर यश मिळवतो.

आणखी वाचा : घरातली तुळस देखील देते शुभ-अशुभ घटनांचे संकेत, ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष करू नका

टीमवर्क: चाणक्यजींचा असा विश्वास आहे की, एखादी व्यक्ती कधीही एकट्याने यश मिळवत नाही, त्याच्याकडे नेहमी टीमसोबत काम करण्याची प्रवृत्ती असायला हवी. कारण सर्वांना सोबत घेतल्याने सर्व काही व्यवस्थित होते.

आणखी वाचा : Chanakya Niti : अशा लोकांकडे लक्ष्मी कधीच येत नाही, चाणक्य नीतिमध्ये सांगितल्या आहेत ‘या’ गोष्टी

संभाव्यता: आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीला त्याच्या क्षमतेची योग्य माहिती असली पाहिजे आणि नेहमी त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने अनेकदा नुकसान होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti astrology if you want to get success in career then remember these 5 things prp
First published on: 24-11-2021 at 21:04 IST