scorecardresearch

Premium

Chanakya Niti : अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहा, नाहीतर डोकं आपटून रडाल आणि आयुष्यही उद्ध्वस्त होईल

शिकवलेले धडे आजच्या काळातही खूप कामी येतात. हे धडे लोकांना अडचणी आणि संकटांपासून वाचवतात. त्याचबरोबर आनंदी जीवनही जगता येतं. आचार्य चाणक्यांनी महिला आणि मित्रांबद्दल सांगितलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

Chanakya-Niti
(Photo: Jansatta)

Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य हे एक उत्तम मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ तर होतेच, शिवाय जीवनाविषयी एक उत्तम मार्गदर्शक देखील होते. चांगले जीवन जगण्याचे त्यांनी शिकवलेले धडे आजच्या काळातही खूप कामी येतात. हे धडे लोकांना अडचणी आणि संकटांपासून वाचवतात. त्याच बरोबर आनंदी जीवनही जगता येतं. त्यांच्या या महत्त्वाच्या गोष्टींचा संग्रह चाणक्य नीति शास्त्रात आहे. आज आपण आचार्य चाणक्यांनी महिला आणि मित्रांबद्दल सांगितलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

the other eden
बुकरायण: ‘चित्रदर्शी’ विस्थापन कहाणी..
Who is Satish Malhotra
खऱ्या आयुष्यातील ‘बॉस’! कर्मचार्‍यांचा पगार वाढवण्यासाठी चक्क स्वतःचा पगार केला कमी, कोण आहेत सतीश मल्होत्रा?
Women, menopause problems sex relations partner
कामजिज्ञासा: मेनॉपॉजच्या काळात शरीरसंबंधांचा त्रास होतोय?
Chanakya Niti religion if you want to become a successful person in life then pay attention to these 4 things of acharya chanakya
Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी ठेवा लक्षात

अशा महिलांच्या संगतीमुळे होते बदनामी
आचार्य चाणक्य म्हणतात की, चारित्र्यहीन लोकांची संगत नेहमीच वाईट असते. माणसाला अनेक प्रकारच्या संकटात टाकते. दुसरीकडे, जर स्त्री चारित्र्यहीन असेल तर अशा परिस्थितीत तुमची निंदा होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा स्त्रीसोबतची संगत नेहमी टाळावी.

आणखी वाचा : Guru Rashi Parivartan 2022: नवीन वर्षात या ३ राशींना मिळणार देवगुरू बृहस्पतीचा आशीर्वाद, नशीब उजळणार

चाणक्य नीतिमध्ये असं म्हटलं आहे की, दुष्टांना कधीही कोणत्याच प्रकारची मदत करू नये. कारण तुम्ही त्यांचे कितीही चांगलं केलं तरी ते तुमचं नुकसान करण्यापासून मागे हटणार नाहीत. त्याचप्रमाणे मूर्ख माणसाला ज्ञान देणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणे होय. एका मूर्ख माणसाला तुमच्या ज्ञानाची आणि वेळेची किंमत कधीच समजणार नाही.

आणखी वाचा : Health Tips : पीनट बटरचे हे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाचा सविस्तर…

मूर्ख मित्र खूप नुकसान करतात
चांगल्या मित्रांचा सहवास जीवनात प्रगती आणि आनंद देतो. ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवतात. वाईट काळात मदत करतात, चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवतात. योग्य सल्ला देतात. दुसरीकडे, मूर्ख मित्रामुळे चांगल्या माणसाचं आयुष्य खराब व्हायला वेळ लागत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की मित्रांचा सहवास अत्यंत जपून करावा. याशिवाय चुकीची कामे करणाऱ्या लोकांना कधीही मित्र बनवू नका. कारण त्यांच्या चुकीचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chanakya niti says always stay away from characterless woman and fool friend otherwise your life ruined prp

First published on: 22-12-2021 at 21:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×