पावसाळा ऋतू सर्वांचा आवडता आहे. पावसाळ्यातील निसर्गातील वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते. मात्र , पावसाळ्यात अनेक संसर्ग देखील पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात हवामानानुसार जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. कपड्यांपासून, पादत्राणे, त्वचा आणि केसांची काळजी घेणं आवश्यक आहे. तर आज जाणून घेऊया अशा काही टिप्स ज्या तुम्हाला या उपयुक्त ठरू शकतात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्वाच्या टिप्स

१) कापूस त्वचेला सर्वात अनुकूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात कॉटन कपडे घाला. विणलेला टी-शर्ट, टॉप आणि कुर्ती हा उत्तम पर्याय आहे. कॅप्री, स्कर्ट, ट्यूनिक, लाँग फ्रॉक देखील घालता येईल.

२) चामड्याचे शूज आणि सँडल घालू नका , त्याऐवजी स्टायलिश चप्पल, सँडल किंवा रबर आणि प्लास्टिकचे शूज पावसात वापरता येतील.

३) दागिन्यांमध्ये प्लास्टिकचे मणी हलके आणि सुंदर असतील, जड दागिने पावसाळ्यात घालू नका.

४) या ऋतूमध्ये दररोज केस धुणे आवश्यक असते. केस तज्ञ म्हणतात की केस सौम्य शाम्पूने धुवा. प्रत्येक वॉशनंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनर वापरा. केस गळणार नाहीत किंवा ते कोरडे आणि निर्जीव होणार नाहीत याची काळजी घ्या.

५) ओल्या केसांमध्ये उवा होण्याचा धोका असतो, त्यामुळे पावसात डोके ओले असताना शॅम्पू करणे आवश्यक आहे.

५) ओल्या केसांमध्ये उवा होण्याचा धोका असतो, त्यामुळे पावसात डोके ओले असताना शॅम्पू करणे आवश्यक आहे.

६) पावसाळ्यात चिकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी चंदन पावडर आणि गुलाबपाणी एकत्र करून चेहरा, मान आणि हातावर लावा .

७) खोबरेल तेलात थोडी पावडर मिसळा आणि मानेवर आणि आसपासच्या भागात लावा.

८) गुळगुळीत त्वचेसाठी मध आणि लिंबाचा रस एकत्र करून त्वचेवर लावू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change your lifestyle in the rainy season learn these useful tips gps
First published on: 10-06-2022 at 19:03 IST