देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी आपल्या हॅचबॅक कार सेलेरिओचा (CELERIO) नवीन अवतार ‘ऑल न्यू सेलेरियो २०२१’ लाँच केला. कंपनीने ही कार ४.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कारचे सरासरी मायलेज २६.६८ किलोमीटर प्रति लिटर (kmpl) आहे.

सर्वाधिक पेट्रोल इंधन कार्यक्षम कार

जेन नेक्स्ट के १० सी इंजिनसह बनवलेली ही पहिली कार आहे. नवी सेलेरिओ ही भारतातील सर्वात जास्त पेट्रोल इंधन कार्यक्षम कार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही कार पाचवी जनरल हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. डिलिव्हरीबद्दल कंपनीने म्हटले आहे की, नवीन सेलेरियो लवकरच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

Xiaomi Company 14 Series in India launch on March seven Five things about the phone You Must Know Before Buy
Xiaomi चा स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच; खरेदीपूर्वी ‘या’ पाच गोष्टी जाणून घ्या…
Tata Punch Car
ऐकलं का…टाटाची ‘ही’ सुरक्षित कार १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?  
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

(हे ही वाचा: सेकंड हँड कारची मागणी वाढली! २५ टक्क्यांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या कारण )

फिचर्स कोणते आहेत?

नवीन सेलेरिओ २०२१ कारमध्ये सात इंच टचस्क्रीन कन्सोल, स्टार्ट आणि स्टॉपसाठी पुश बटण, ऑटो इंजिन स्टार्ट/स्टॉप, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आहे. तुम्ही मारुती सुझुकी सेलेरियो २०२१ दोन नवीन फायर रेड आणि स्पीडी ब्लू कलर पर्यायांसह आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे आणि कॅफीन ब्राउनमध्ये खरेदी करायला मिळेल.

कार सीएनजीमध्येही येणार

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव सांगतात की, शहरी भागातील स्टायलिश कारप्रेमींना लक्षात घेऊन ही कार सादर करण्यात आली आहे. विशेषत: २४-३५ वयोगटातील ग्राहकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सेलेरिओचे आतचे मॉडेल्स २०२१ लाँच झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. कंपनी त्याच्यानंतर पोर्टफोलिओमध्ये सीएनजी ट्रिम देखील समाविष्ट करेल.

( हे ही वाचा: Ducati भारतात लॉंच करणार ‘ही’ शानदार बाईक; जाणून घ्या काय असतील फीचर्स आणि किंमत )

कार इंजिन

कारमध्ये ९९८ सी सी के १० सी ३ सिलेंडर इंजिन आहे. इंजिन ४९ के डब्ल्यू @ ५५०० आर पी एम ची कमाल पॉवर देते आणि ८९ एन एम @३५०० आर पी एम ची कमाल टॉर्क जनरेट करते. कारचे एकूण वजन १२६०किलो आहे.

( हे ही वाचा: Indian Air Force Recruitment 2021: भारतीय हवाई दलात गट सी पदांसाठी भरती, दहावी उत्तीर्णांसाठीही नोकरीची संधी )

पाच सीटची ही कार आहे. कारची सामान क्षमता ३१३ लीटर आहे. कारची इंधन टाकीची क्षमता ३२ लीटर आहे. कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग आहे. कारला समोर डिस्क ब्रेक सिस्टम आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक सिस्टम आहे.